Setback to BJP In Chandigarh: भाजपला धक्का, 'आप'चा उमेदवार चंदीगडचा महापौर; सुप्रिम कोर्टाने फिरवला पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय फिरवत सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या बाजूने निर्णय दिला.

Supreme Court

चंदीगड महापौर पद (Chandigarh Mayor Election) निवडणूक गौरव्यवहार प्रकरणा भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय फिरवत सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या बाजूने निर्णय दिला. ज्यामळे 'आप'चे (AAP) उमेदवार कुलदीप कुमार यांचा चंदीगडचे महापौर (Chandigarh Mayor) होण्याचा मार्ग मोकळा झाला. रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी जाणूनबुजून मते अवैध ठरवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडयावर व्हायरल झाले होते. त्यानंतर अनेक आठवड्यांच्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रिटर्निंग ऑफिसरच्या कृतीची सुप्रिम कोर्टाकडून गंभीर दखल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कुलदीप कुमार यांना चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत योग्य विजेता म्हणून मंगळवारी शिक्कामोर्तब केले. न्यायालयाने कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झालेली घटना आणि रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यानी केलेली कृती याची गंभीर दखल घेतली. ज्यामध्ये आढळूनआले की, AAP उमेदवाराच्या बाजूने टाकलेली आठ मते मुद्दाम बाद करण्यात आली आहे. दरम्यान, मसिहा यांना आता त्यांच्या कृतीबद्दल कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध 'कारणे दाखवा' नोटीस जारी केली आहे. न्यायालायाने कठोर शब्दात ताशेरे ओढत मसिह यांचे वर्तन म्हणजे "लोकशाहीची थट्टा" असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Chandigarh Mayor poll: चंदीगड महापौर निवडणूक प्रकियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी अधिकारी अनिल मसिह यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश)

पीठासीन अधिकाऱ्यामुळे निवडणूकच कायद्याच्या कचाट्यात

पीठासीन अधिकारी मसिह यांनी भाजपच्या मनोज सोनकर यांना महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले. ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. मतांची एकूण संख्या पाहता बहुमत आप आणि काँग्रेस यांच्या बाजूने स्पष्ट दिसत होते. असे असताना स्वत: पीठासीनअधिकाऱ्यांनीच काही मते बाद ठरवत भाजपला फायदा होईल असे वर्तन केले. इतकेच नव्हे तर पीठासीन अधिकाऱ्यांनी सोनकर यांना कुमार यांच्या 12 मतांच्या तुलनेत 16 मते दिली. ज्यामुळे निवडणूकच कायद्याच्या कचाट्यात सापडली. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, आठ मतांची मोजणी झाली असती, तर 'आप'च्या उमेदवाराने आरामात विजय मिळवला असता. (हेही वाचा, BJP Manoj Sonkar Resigns: सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांचा राजीनामा)

दरम्यान, चंदीकड महापौर पदाची निवडणूक झाल्यापासून आणि ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्यापासून आपच्या तीन नगरसेवकांनी भाजपची बाजू घेतली. परिणामी या निवडणुकीतील समीकरण लक्षणीयरित्या बदलले . भाजपकडे आता 35 सदस्यांच्या सभागृहात 19 मते आहेत, ज्यात चंदीगड लोकसभा खासदाराचा समावेश आहे, ज्यांना पदसिद्ध सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार आहे. आप-आणि काँग्रेसकडे फक्त 17 आहेत. त्यामुळे जर कोर्टाने फेरनिवडणुकीचे आदेश दिले असते भाजपला स्पष्ट फायदा झाला असता. मात्र, कोर्टाने तसे कोणतेही आदेश न देता झालेल्या मतदानाचीच मतमोजणी केली.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप