Serum Institute 250 रुपयांमध्ये पुरवू शकते कोरोना विषाणू लस; केंद्र सरकारसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात- Report

देशातील बर्‍याच राज्यांत पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्गाची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये अजूनही कोरोना व्हायरसचा (Coronavirus) हाहाकार चालूच आहे. देशातील बर्‍याच राज्यांत पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्गाची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसची (Covid-19 Vaccine) वाट पाहत आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) असा दावा केला आहे की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस बाजारात आणता येईल. लवकरच जगातील सर्वात मोठी लवकरच लस उत्पादक सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया केंद्र सरकारसोबत लसीचा पुरवठा करारावर स्वाक्षरी करेल. सीरमने कोव्हीशिल्डच्या इमर्जन्सी वापरासाठी नियामकाकडे अर्ज केला आहे. महत्वाचे म्हणजे या लसची किंमत प्रति डोस 250 रुपये निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस केंद्र सरकारला प्रती डोस 250 रुपये दराने देऊ शकते. केंद्र व सीरममधील याबाबतची बोलणी सध्या अंतिम टप्प्यात आहेत. बिझिनेस स्टँडर्ड या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. खास गोष्ट म्हणजे यापूर्वी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला म्हणाले होते की, या लसीची किंमत प्रति डोस एक हजार रुपये असेल. कंपनीने देशात आपत्कालीन लसीचा वापर करण्यासाठी अर्ज केला आहे. अदार पूनावाला म्हणतात की, औषधनिर्माण कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोविड-19 ची संभाव्य लस बरीच प्रभावी असल्याचे आढळले आहे, व ही लवकरच लोकांना उपलब्ध होऊ शकेल. (हेही वाचा: SII पाठोपाठ Bharat Biotech चा देखील Emergency Use Authorisation साठी DCGI कडे अर्ज)

सीरम संस्थेत अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाची लस तयार केली जात आहे. पुढच्या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला 10 कोटी कोरोना लसीची मात्रा उपलब्ध होईल असा दावा पूनावाला यांनी केला. त्याच वेळी, अधिक डोस फेब्रुवारीच्या अखेरीस तयार केले जाऊ शकतात असेही त्यांनी सांगितले आहे. ही लस जनतेला लवकरात लवकर दिली जाईल अशी अपेक्षा आहे व काही आठवड्यांत त्याचा निर्णय होईल. सीरम संस्था प्रथम भारतीयांना लस देण्यावर भर देत असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर ही लस इतर देशांमध्ये दिली जाईल. मात्र, इंडिअन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च, सीरम संस्था आणि आरोग्य मंत्रालयाकडून या वृत्तसंस्था रॉयटर्सला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.