Exit Poll Results 2019 नंतर दुसर्‍या दिवशीही शेअर बाजार तेजीत; Sensex ने उच्चांक मोडत 39,554 चा गाठला टप्पा

आज (20 मे ) दिवशी सेंसेक्सने सर्वाधिक उसळी घेत 39,554.28 वर उघडला आहे.

Sensex (File Photo)

19 मे दिवशी लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या मतदानाचे सातही टप्पे पार झाल्यानंतर एक्झिट पोल (Exit Poll) हाती आले. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एनडीए ची सत्ता केंद्रात येऊ शकते. असे सांगण्यात आले आहे. त्याचा परिणाम आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून शेअर बाजारावर दिसला. सोमवारी 888 अधिक अंकांनी वर आलेला सेन्सेक्स दुसर्‍या दिवशी देखील तेजीत पहायला मिळाला आहे. आज (20 मे ) दिवशी सेंसेक्सने सर्वाधिक उसळी घेत 39,554.28 वर उघडला आहे. Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार

ANI Tweet 

यंदा 11 एप्रिल ते 19 मे 2019 या सात टप्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. दरम्यान 19 मे च्या संध्याकाळी अनेक नामवंत संस्थांचे एक्झिट पोल हाती आले आता 23 मे दिवशी या निवडणूकीचा अंतिम निकाल हाती येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now