SBI मध्ये PPF खाते सुरु करुन मिळवा भरघोस व्याज, जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रिया
ही सुविधा ग्राहकांना सरकारकडून छोट्या स्वरुपातील बचतीचा एक प्रकार आहे. यावर व्याजदर केंद्र सरकारकडून तीन महिन्यातून एकदा निर्धारित केला जातो. सध्या पीपीएफ खात्यावर 7.9 टक्के वर्षभरासाठी व्याज दर ठेवण्यात आला आहे.
पब्लिक प्रोव्हिडंट फंड ज्याला सोप्या भाषेत PPF नावाने ओखळले जाते. ही सुविधा ग्राहकांना सरकारकडून छोट्या स्वरुपातील बचतीचा एक प्रकार आहे. यावर व्याजदर केंद्र सरकारकडून तीन महिन्यातून एकदा निर्धारित केला जातो. सध्या पीपीएफ खात्यावर 7.9 टक्के वर्षभरासाठी व्याज दर ठेवण्यात आला आहे. पीपीएफ खात्यात कमीतकमी 500 रुपये ठेवून सुरु करता येते. तसेच जास्तीत जास्त रक्कम एका वर्षासाठी 1.15 लाख रुपये जमा करु शकता.
पीपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर आयकर द्यावा लागत नाही. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुरु करता येते. काही बँक जसे एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक ही पीपीएफ खाते सुरु करण्याची सुविधा ग्राहकांना देते. जर तुम्हाला पीपीएफ खाते सुरु करायचे झाल्यास तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने ही सुरु करु शकता. तुम्ही एसबीआय मध्ये पीपीएफ खाते तुम्हाला सुरु करता येणार आहे.जाणून घ्या पीपीएफ खाते ऑनलाईन पद्धतीने कसे सुरु करु शकता.
>SBI ऑनलाईन खात्यावर लॉगिन करा. विनंती आणि चौकशी टॅबर क्लिक करा.
>>तुम्ही मेन्यू मध्ये गेल्यास तुम्हाला खालच्या बाजूस पीपीएफ खाते सुरु करण्याचे ऑप्शन दाखवले जाईल. त्यावर क्लिक करा. यावर तुम्हाला तुमच्या बाबत अधिक माहिती विचारण्यात येईल.
>>जर तुम्ही अल्पवयीन मुलाचे खाते सुरु करत असल्यास तेथे तुम्हाला नाव, वय आणि मुलासोबतचे नाते काय आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच शाखा क्रमांकासह तुम्ही जेथे पीपीएफ खाते सुरु करणार आहात त्याबद्दल ही सांगावे लागणार आहे.
>>सर्व माहिती दिल्यावर एक डायलॉग बॉक्स देण्यात येईल त्यावर तुमचा फॉर्म पूर्णपणे भरला गेला असल्याची सुचना दाखवली जाईल.
>>तुम्हाला देण्यात येणाऱ्या रेफरेंन्स संख्यासोबत तो फॉर्म डाऊनलोड करा.
>>फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला केवायसी कागदपत्रांसह तो प्रिंट करुन भरावा लागणार आहे. त्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये हा फॉर्म तुम्हाला शाखेत जमा करावा लागणार आहे.
(Fixed Deposit वरील व्याजदरात कपात पण 'या' सुविधा वरिष्ठांसाठी फायद्याच्या ठरतील)
पीपीएफ खात्याचा कालावधी हा मूळ रुपात 15 वर्षांसाठी आहे. त्यानंतर ही तु्म्हाला त्याचा कालावधी वाढवायचा असल्यास एक अर्ज करुन 5 वर्षापर्यंत वाढवू शकता. या योजनेत काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. त्यानंतरच तुम्हाला खात्यामधील पैसै काढण्याची परवानगी दिली जाते. ही सुविधा अल्पवयीन खात्यासाठी सुद्धा लागू आहे. एवढेच नाही जर एखाद्या व्यक्तीला आपले खाते ट्रान्सफर करायचे असल्यास तो एसबीआय किंवा अन्य कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करु शकतो.