SBI, HDFC बँकेच्या 'या' सेवा आज रात्री राहणार बंद, दिवसाच महत्वाची कामे उरकून घ्या

त्यामुळे बँकेने आपल्या ग्राहकांसाठी या संदर्भात सुचना दिली आहे.

ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

देशातील दोन दिग्गज बँक एसबीआय (State Bank Of India) आणि एचडीएफसीच्या (HDFC) काही सेवा आज रात्री काही वेळासाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेने आपल्या ग्राहकांसाठी या संदर्भात सुचना दिली आहे. अशातच जर तुम्ही नेटबँकिंग, युपीआय किंवा बँक खात्यासंबंधित कोणतेही काम करणार असल्यास ते दिवसाच उरकून घ्या. या दोन्ही बँकांनी त्यांच्या कोणत्या सेवा ग्राहकांसाठी बंद असणार आहेत ते जाहीर केले आहे.(गोव्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता चित्रपट, मालिका आणि म्युझिकल शोच्या शूटिंगसाठी देण्यात आलेली परवानगी मागे घेण्यात आली- एसपी देसाई)

देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआयकडून असे सांगण्यात आले आहे की, 7 मे रोजी रात्री 10.15 मिनिटांनी आणि 8 मे रोजी दुपारी 1.45 मिनिटांपर्यंत मेंटनेंसचे काम करण्यात येणार आहे. या दरम्यान एसबीआय ग्राहकसांना INB/YONO/YONO Lite/UPI सारख्या सुविधा वापरता येणार नाही. म्हणजेच या सुविधा बंद ठेवल्या जाणार आहेत. एसबीआयने आपल्या करोडो लोकांना हा अलर्ट जाहीर केला असून बँकेचे असे म्हणणे आहे की, ग्राहकांचा अनुभव अधिक उत्तम बनवण्यासाठी हे काम केले जात आहे.(Indian Railway: कोरोना काळात भारतीय रेल्वेला फटका, उद्यापासून 'या' 16 विशेष रेल्वे रद्द, येथे पाहा पूर्ण यादी)

Tweet:

तर खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक एचडीएफसीने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी एक सूचना जाहीर केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, त्यांचे नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा शुक्रवारी रात्री बंद राहणार आहेत. ग्राहकांना त्या संदर्भातील एक ई-मेल सुद्धा पाठवण्यात आला आहे. त्यात असे लिहिले आहे की, काही मेंटेनेंसच्या कामसाठी 8 मे रात्री 2 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजताच्या दरम्यान नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिगची सेवा उपलब्ध नसणार आहे. यामुळे आम्ही क्षमस्वी आहोत.

एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील अगदी नवाजलेली बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. यापूर्वी बँकेच्या इंटरनेट सेवेत समस्या आली होती त्यामुळेच आता बँक अशी कामे करत आहेत. तर कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी बँकेने नुकत्याच 19 शहरात 50 ठिकाणी मोबाईल ऑटोमेटेड टेलरिंग मशीन (ATM) उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली होती. या एटीएमच्या माध्यमातून 15 प्रकारचे ट्राजेक्शन करता येणार आहेत.