1 ऑगस्ट पासून SBI ची IMPS सुविधा होणार मोफत, घर-गाडी खरेदी करणे सुद्धा होणार स्वस्त
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक वेळी नव्या सुविधा उपलब्ध करुन देते.
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक वेळी नव्या सुविधा उपलब्ध करुन देते. आता येत्या 1 ऑगस्ट पासून बँक त्यांच्याकडे असलेल्या IMPS सुविधेवर शुल्क आकारणार नाही आहे. म्हणजेच ग्राहकांना ही सुविधा बँकेकडून मोफत देण्यात येणार आहे. या सुविधेअंतर्गत घर-गाडी खरेदी करणे स्वस्त होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जर तुम्ही एसबीआय ग्राहक असल्यास तुम्हाला 1 ऑगस्टपासून इमीडेट पेमेंट सर्विस (IMPS) ही सुविधा बँकेकडून मोफत देण्यात येणार आहे. परंतु आता पर्यंत ग्राहकांना इमीडेट पेमेंट सर्विसवर निश्चित केलेले शुल्क आकारले जात होते. तसेच आकारण्यात येणारा शुल्क पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ठरवलेल्या रक्कमेनुसार बदल जातो. तसेच आयएमपीएस ही सुविधा ग्राहक ऑनलाईन पद्धतीने सुद्धा वापरु शकतात. या सुविधेमुळे ग्राहक काही मिनिटांतच जवळजवळ 2 लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या बँक खात्यात जमा करु शकतात.
तसेच ऑगस्ट महिन्यापासून इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणे स्वस्त होणार आहे.गेल्या काही दिवसात या गाड्यांवर जीएसटी 12 टक्क्यांवरुन कमी करुन 5 टक्के करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी लागणाऱ्या चार्जरसाठी सुद्धा 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. (Income Tax Return: खुशखबर! आयकर भरण्याची मुदत वाढली; अनेक करदात्यांना दिलासा, जाणून घ्या नवी तारीख)
त्याचसोबत घर खरेदी करणेसुद्धा स्वस्त होणार असून प्रॉपर्टी रेट कमी होणार आहेत. तर ग्रेटर नोएडा आणि नोएडा येथे घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आकारला जाणारा शुल्क 6 टक्क्यांनी कमी होणार आहे. ग्रुप हाउसिंगसाठी 6 टक्के आणि कमर्शिअल घरांसाठी 25 टक्क्यांनी अतिरिक्त शुल्क कमी होणार आहे.