IPL Auction 2025 Live

SBI कडून Home Loan च्या व्याज दरात कपात, KYC संदर्भात सुद्धा ग्राहकांना दिलासा

कारण देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआय (SBI) कडून गृह कर्जावरील (Home Loan) व्याजाच्या दरात घट करण्यात आली आहे.

SBI (Photo Credits: Facebook)

जर तुम्ही नवं घर घ्यायचे स्वप्न पाहत असल्यास तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण देशातील सर्वाधिक मोठी बँक एसबीआय (SBI) कडून गृह कर्जावरील (Home Loan)  व्याजाच्या दरात घट करण्यात आली आहे. एसबीआयने शनिवारी एक जाहिरात जाहीर करत असे म्हटले की, आता बँकेच्या होम लोनवरील व्याज दराची सुरुवात 6.70 टक्क्यांपासून होणार आहे. बँकने असे म्हटले की, 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास त्याच्या व्याज दराची सुरुवात 6.70 टक्के असणार आहे.(कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या 31 मे पर्यंत स्थगित)

एसबीआयने असे म्हटले की, 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत होम लोनवर 6.95 टक्के व्याजाच्या दराची सुरुवात होणार आहे. या व्यतिरिक्त 75 लाखांहून अधिक कर्ज घेतल्यास 7.05 टक्के व्याज दर असणार आहे. बँक महिलांसाठी होम लोनसाठी अतिरिक्त सूट ही दिली जाणार आहे. बँकेने असे म्हटले की, महिला कर्जदारांना 0.05 टक्क्यांची विशेष सूट दिली जाणार आहे. तसेच बँक YONO अॅपच्या युजर्सला सुद्धा सूट देत आहे. एसबीआयने असे म्हटले की, योने अॅपच्या माध्यमातून ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी आमच्या होम लोन ग्राहकांना डिजिटल प्रोत्साहन रुपात 0.05 टक्क्यांची सूट देत आहे.

एसबीआयने KYC मध्ये सुद्धा ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने ट्विट करत असे म्हटले आहे की, राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पोस्ट किंवा रजिस्टर ई-मेल आयडीच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या कागदपत्रांच्या मदतीने केवायसी अपडेट होणार आहे. ग्राहकांना आता केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नसणार आहे. त्याचसोबत 31 मे पर्यंत जर केवायसी अपडेट नाही झाल्यास तर सीआयईएफ फ्रीज होणार नाही आहे. अर्थात बँकेची सेवा सुरुच राहणार आहे.(कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर PMJJBY योजनेअंतर्गत मिळेल 2 लाख विम्याचे संरक्षण; नॉमिनी 'या' पद्धतीने करू शकतात क्लेम)

Tweet:

आरबीआयच्या आकडेवारीनुसार या वर्षात मार्च महिन्यात बँकेने कर्जाच्या वितरणात 4.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात ती 6.8 टक्के होती. या महिन्यात फूड क्रेडिट 24.4 टक्के कमी करुन 18.3 टक्के आणि सर्विस सेक्टरसाठी क्रेडिट 7.4 टक्के कमी करुन 1.4 टक्के केला आहे. पर्सनल लोनमध्ये वाढीव दर या महिन्यात 15 टक्के कमी होऊन 14.2 टक्के झाले आहे.