बुंदेलखंड मध्ये 'झाड वाचवा' चळवळ; लोकांना आठवली Chipko Movement

'मला कापू नका', 'वृक्ष-झांड होतील नष्ट... तर मानावाला होती कष्ट..', 'कपया मला वाचवा', 'प्लिज सेव्ह मी' असे संदेश लिहीले आहेत.

Save The Tree Movement | (PC - Facebook)

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील चमोली जिल्ह्यात जशी Chipko Movement सुरु झाली होती. आगदी काहीशा तशाच पद्धतीने बुंदेलखंड येथेही 'झाड वाचवा' चळवळ (Save The Tree Movement) सुरु झाली आहे. बुंदेलखंड हे उत्तर भारतातील एक ऐतिहासिक क्षेत्र आहे. याच क्षेत्रात झाडं, जंगल वाचविण्यासाठी चळवळ सुरु झाली आहे. झांसी येथील एक बिगरशासकीय स्वयंसेवी संघटना कोहिनूर ऑलवेज ब्राइट (Kohinoor Always Bright Organization) ने ही चळवळ सुरु केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर घोषणा लिहून नागरिकांनी पर्यावरण जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पर्यावरण प्रेमी संघटनांच्या सदस्यांनी सकाळी रस्त्यांकडेच्या झाडांव घोषणा लिहिल्या, झाडांना मिठ्या मारल्या. 'मला कापू नका', 'वृक्ष-झांड होतील नष्ट... तर मानावाला होती कष्ट..', 'कपया मला वाचवा', 'प्लिज सेव्ह मी' असे संदेश लिहीले आहेत.

कोहिनूर ऑलवेज ब्राइट संघटनेच्या अध्यक्षा वैशाली पुंशी यांनी सांगितले की, त्यांची संस्था सातत्याने पर्यावरण साहित्य आणि इतर विषयांवर समाजप्रबोधन करते. झाडे वाचविण्यासाठी मोहीम राबवते. पर्यावरण संवर्धनासाठी झाडांचे संरक्षण आणि वृक्षारोपन ही काळाची गरज बनली आहे. म्हणूनच आम्ही पर्यावरण संवर्धनासाठी झांडांवर संदेश लिहून जनजागृती करत असल्याचे वैशाली पुंशी सांगतात. (हेही वाचा, 'पावसाळ्यात झाडे लावा, हिवाळ्यात दारु मोफत मिळवा', महापालिकेच्या अधिकाऱ्याला नोटीस)

कोहिनूर ऑलवेज ब्राइट संघटनेच्या अंजलि दत्ता, श्रुति चडढ़ा आणि सपना सांगतात की, गो ग्रीन मिशन मोहिमेचे पहिले ध्येय आहे नागरिकांना वृक्षतोड करण्यापासून वाचविणे. म्हणूनच आम्ही गेरुचा वापर करुन झाडांवर घोषवाक्ये लिहीली आहेत. जेनेकरुन झाडांना इजा पोहोचू नये.