Samruddhi Mahamarg Accident: वशिम मध्ये समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 10-12 प्रवासी गंभीर जखमी

जंगली प्राणी समृद्धी महामार्गावर येणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Accident (PC - File Photo)

वाशिम (Washim) जिल्ह्यातील कार्ली (Karli) गावा जवळ समृद्धी महामार्गावर नीलगाय आडवी आल्याने खाजगी ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाला असून त्यामध्ये बसमधील 22 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये 10-12 प्रवाशांना गंभीर प्रकारची दुखापत झाली आहे.

नागपूर वरून पुण्याला जात असणार्‍या मार्गावर ट्रक आणि त्याच्या मागे खाजगी बस चालत होती. ट्रक समोर अचानक नीलगाय आली. या गाईला वाचवण्यासाठी ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. पूजा कंपनीची खासगी ट्रॅव्हल्स बस नागपूर - पुणे जात असताना वाशिम जिल्ह्यातील दोनद ते कारंजा दरम्यान कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच कारंजा येथील रूग्णवाहिका तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आल्या. जखमींवर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 22 प्रवासी जखमी असून त्यामध्ये 10-12 गंभीर जखमी आहेत. तर बसच्या पुढल्या भागाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नक्की वाचा:  Samruddhi Expressway: समृद्धी द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल; दर 5 किलोमीटरवर बसवल्या जाणार Rumble Strips.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका विविध कारणांमुळे सुरूच आहे. जंगली प्राणी समृद्धी महामार्गावर येणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.