उत्तर प्रदेश मध्ये 'महाचंडी यज्ञ' साठी समाजवादी पार्टीच्या मुस्लिम आमदार Sayeda Khatoon यांच्या हजेरी नंतर हिंदू संघटनेकडून मंदिरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण

समय माता मंदिर हे राप्ती नदीच्या काठावर असलेल्या सिद्धार्थ नगर जिल्ह्यात हिंदूंसाठी एक आदरणीय धार्मिक स्थळ आहे.

Representative Image

उत्तर प्रदेश मध्ये सिद्धार्थनगर जिल्ह्यामध्ये समाजवादी पक्षाच्या मुस्लीम आमदार Sayeda Khatoon यांनी भेट दिलेले मंदिर नंतर गंगाजल शिंपडून स्वच्छ करण्यात आल्याचा दावा समोर आला आहे. रविवारी सय्यदा Samay Mata temple मध्ये गेल्या होत्या. 'महाचंडी यज्ञ' साठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी मंदिराला भेट दिल्याने नाराज झालेल्या काहींनी मंदिराची गंगाजल शिंपडून स्वच्छता केली. यावेळी काही मंत्रांचेही उच्चारण झाल्याचं मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

बढनी चाफा नगर पंचायत चे प्रमुख धर्मराज वर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली ही शुद्धिकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. PTI च्या वृत्तानुसार, 'सय्यदा या मुस्लिम आहेत आणि त्या मांसाहार (cow meat) खातात त्यामुळे ही पवित्र जागा अशुद्ध झाल्याचं त्यांचं मत आहे. शुद्धिकरणानंतर पुन्हा सारे पूजा-अर्चना करण्यासाठी शुद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. हक्क नसलेल्या काही लोकांनी सय्यदांना आमंत्रित केले होते. असा प्रकार पुन्हा सहन केला जाणार नसल्याचंही वर्मा म्हणाले आहेत. Rahul Gandhi यांच्या वैष्णोदेवी यात्रेनंतर BJP ने केले परिसराचे शुद्धीकरण; यात्रा ट्रॅकवर शिंपडले गंगाजल .

Sayeda Khatoon यांनी PTI शी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपण लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि येत्या काळात सार्‍याच धर्मांच्या प्रार्थनास्थळांना भेट देणं कायम ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. अशा घटनांमुळे त्यामध्ये मागे हटणार नसाल्याचेही ते म्हणाले आहेत. 'समय माता मंदिर' शी निगडीत काही ब्राम्हण आणि संत यांच्यासोबत 10 दिवसांपूर्वी झालेल्या भेटीमध्ये आपल्याला निमंत्रण मिळालं असल्याचं त्या सांगतात. 'मी सार्‍या धर्मांचा आदर करते आणि प्रतिनिधित्त्व करत असलेल्या सार्‍याच लोकांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला जाईल' असं त्या म्हणाल्या आहेत. खातून यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक मंदिरांचाही जीर्णोद्धार केला आहे. सय्यदा यांनी सांगितल्या नुसार, वर्मा हे निवडून आलेले सदस्य असून ते भाजपा आणि यूपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनी सोबत जोडलेले आहेत.

मंदिराच्या श्रीदत्त कृष्ण शुक्ला या पुजार्‍यांनी सांगितल्यानुसार सय्यदा या महायज्ञासाठी आमंत्रित होत्या आणि त्या संध्याकाळी आल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी वर्मा आले त्यांनी सय्यदाला का बोलावले याची विचारणा केली. सोबतच तिच्या वावरामुळे मंदिर अपवित्र झाल्याचं म्हटलं. नंतर मंदिर गंगाजल शिंपडून स्वच्छ केल्याचेही ते म्हणाले.

समय माता मंदिर हे राप्ती नदीच्या काठावर असलेल्या सिद्धार्थ नगर जिल्ह्यात हिंदूंसाठी एक आदरणीय धार्मिक स्थळ आहे. शेजारील देश नेपाळ आणि जवळपासच्या जिल्ह्यांमधूनही भाविक मंदिराला भेट देतात.