Independence Day 2022: स्वातंत्र्य दिनापूर्वी शूरवीरांना सलाम, 347 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, जम्मू-काश्मीर आघाडीवर

यामध्ये सर्वाधिक 108 पदके जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली आहेत.

इंडियन आर्मी (Photo Credits: IANS)

Independence Day 2022: स्वातंत्र्य दिनापूर्वी (Indepandance Day) म्हणजेच आज 347 पोलिसांना शौर्यसाठी पोलीस पदक (PMG) प्रदान करण्यात आले आहे. आज डीजीपी दिलबाग सिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्व जवानांना पदके देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 108 पदके जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र 42 पदकांसह तर छत्तीसगड 15 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राज्य दलातील एकूण 1,082 पोलीस कर्मचार्‍यांना शौर्यसह सेवा पदकांच्या विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. या संदर्भात रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, शौर्यसाठी 347 पोलीस पदके, विशिष्ट सेवेसाठी 87 राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी 648 पोलीस पदके प्रदान करण्यात आली. (हेही वाचा - Independence Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग नवव्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवणार, दिल्लीत कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात)

केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, शौर्यासाठी 347 पदकांपैकी 204 जवानांना जम्मू-काश्मीरमधील शौर्यपदक, 80 पोलिसांना वामपंथी अतिरेकी किंवा नक्षल हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणी शौर्य दाखविल्याबद्दल आणि 14 पोलिसांना ईशान्य प्रदेशात शौर्य दाखवल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.

यावेळी सर्वाधिक 109 शौर्य पदके केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) मिळाली. यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांना 108, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) 19 आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांना प्रत्येकी सहा पदके मिळाली. राज्याच्या पोलीस दलांपैकी महाराष्ट्राला 42 शौर्य पदके प्रदान करण्यात आली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif