भाजप आमदार Amrit Meena यांचे Cardiac Arrest मुळे निधन

अमृतलाल मीणायांचे निधन (Amrit Meena Dies) झाले आहे. ते 65 वर्षांचे होते. अमृतलाल हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) उदयपूर (Udaipur) जिल्ह्यातील सलूम्बर (Salumber Assembly Constituency) मतदारसंघातील आमदार होते. हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Amrit Meena | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अमृतलाल मीणायांचे निधन (Amrit Meena Dies) झाले आहे. ते 65 वर्षांचे होते. अमृतलाल हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) उदयपूर (Udaipur) जिल्ह्यातील सलूम्बर (Salumber Assembly Constituency) मतदारसंघातील आमदार होते. हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मीना यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना उदयपूरच्या एमबी सरकारी रुग्णालयात काल रात्री दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. मीना यांनी 2013 पासून तीन वेळा आमदार म्हणून काम पाहिले.

पंचायत समिती सदस्य ते आमदार

अमृतलाल मीणा हे राजस्थानमधील वजनदार नेते होते. तळागाळातून आलेला आणि उच्च पदापर्यंत पोहोचलेला राजकीय नेता अशी त्यांची ओळख होती. मीणा यांचा राजकीय प्रवास ग्रामपंचायतपासून सुरु झाला होता. सन 2004 मध्ये त्यांनी राजकीय जीवनास प्रारंभ केला. जेव्हा ते सराडा पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडले गेले होते. पुढे राजस्थानमधील भारतीय जनता पक्ष आणि  स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा दबदबा राहिला. राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवार रघुवीर मीणा यांचा पराभव केला. (हेही वाचा, हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजस्थानच्या राज्यपाल पदाची सूत्रे)

सलूंबर विधानसभा मतदारसंघातून हॅटट्रीक

15 सप्टेंबर 1959 मध्ये जन्मलेल्या अमृतलाल मीणा यांनी सलग तीन वेला सलूंबर विधानसभा मतदारसंघातून निवडूण येण्याची हॅटट्रीक केली होती. 65 वर्षांचे मीणा हे भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक आणि निष्ठावान नेते मानले जात असत. त्यांनी भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवरही विविध प्रकारची महत्त्वपूर्ण पदे भूषवली. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कार्यकर्ते, चाहते आणि आप्तेष्ठांना धक्का बसला आहे. उदयपुर येथील एमबी रुग्णालयासमोर त्याच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी वाढतच आहे. (हेही वाचा, Heart Attack: कमी वयात हृदयविकाराचा धोका कसा टाळाल? कार्डिओलॉजिस्टकडून जाणून घ्या 'या' काही महत्त्वाच्या टीप्स)

हृदयविकाराच्या प्रकरणांमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार आवश्यक

हृदयविकाराचा झटका शरीरामध्ये अचानक उद्भवलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांमुळे होतो. या गुंतागुंतीमुळे जव्हा तुमचे हृदय अचानक काम करणे म्हणजेच धडधडणे थांबवते किंवा अचानकच ते इतक्या अधिक प्रमाणात धडधडू लागते की, ज्यामुळे ते बंद पडते, अशा वेळी हृदयविकाराचा झटका येतो. अशा वेळी शरीरातील रक्त पंप न झाल्याने सदर व्यक्ती बेशुद्ध पडतो. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. त्यात विलंब झाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. अनेकदा वैद्यकीय उपचार सुरु असतानाही गोष्टी हाताबाहेर जातात परिणामी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही प्रयत्न तोकडे पडतात आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्याची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध होतील हे पाहावे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now