Sadhana Broadcast Shares Fraud: Arshad Warsi, त्याची पत्नी Maria Goretti वर सेबी कडून वर्षभराची बंदी
सेबीने अनेक प्रकारचे दंड ठोठावले आहेत, ज्यामध्ये मनीष मिश्रा यांना 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, गौरव गुप्तासह अनेकांवर प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Securities and Exchange Board of India कडून अभिनेता Arshad Warsi, त्याची पत्नी Maria Goretti आणि 57 अन्य लोकांना बॅन करण्यात आले आहे. Sadhana Broadcast चे शेअर्स विकत घेण्यासाठी युट्युब चॅनेल वरून शिफारस केल्याप्रकरणी त्यांच्यावर आता 1-5 वर्ष पर्यंत ही बंदी राहू शकते. अर्शद आणि त्याच्या पत्नीवर एका वर्षाचा प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यांच्यावर मार्केट मध्ये फसवणूकीचे आरोप आहेत.
सेबी कडून एका अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीवर 1 वर्षाचा बॅन टाकण्यात आला आहे आणि 5-5 लाखांच्या दंडांची देखील सुनावणी करण्यात आली आहे. एकूण 1.05 कोटी ची कमाई जप्त करण्याचा आदेश आहे. सेबीच्या दाव्यानुसार, हे लोक मनमानी पद्धतीने कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढवत होते आणि त्यांना जास्त किमतीत म्हणजेच पंप अँड डंपमध्ये विकत होते.
गौरव गुप्ता हा सर्वात मोठा लाभार्थी असल्याचं समोर आलं आहे, ज्याने पंप आणि डंपद्वारे 18.33 कोटी रुपये कमावले असा आरोप आहे. दरम्यान, साधना बायो ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेडनेही 9.41 कोटी रुपयांचा नफा कमावला. सेबीने त्यांच्या नियामक प्रतिसादाचा भाग म्हणून हे बेकायदेशीर नफा परत करण्याचे आदेश दिले आहेत.
सेबीने अनेक प्रकारचे दंड ठोठावले आहेत, ज्यामध्ये मनीष मिश्रा यांना 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, गौरव गुप्तासह अनेकांवर प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
समोर आलेल्या खुलाशात, सेबीने पाच यूट्यूब चॅनेल्स द अॅडव्हायझर, मिडकॅप कॉल्स, प्रॉफिट यात्रा, मनीवाईज आणि इंडिया बुलिश जे चुकीची माहिती पसरवण्यात सहभागी आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या चॅनेल्सनी SBL च्या फसव्या जाहिरातीत भूमिका बजावली, ज्यामुळे त्यात सहभागी असलेल्यांचा सहभाग आणखी वाढला.
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

