RT-PCR Testing Mandatory: रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आलेल्या Symptomatic रुग्णांची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य- केंद्रीय आरोग्य मंत्रालय
परंतु, त्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. अशा रुग्णांची RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
रॅपिड अँटीजन टेस्ट (Rapid Antigen Test) निगेटीव्ह आली आहे. परंतु, त्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. अशा रुग्णांची RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) स्पष्ट केले आहे. यासंदर्भात सर्व राज्यांना गुरुवारी आदेश देण्यात आले. कोरोनाचे प्रमाण जास्त असलेल्या राज्यांमध्ये अॅटींजन टेस्ट निगेटीव्ह आल्यानतंर कोरोनाची लक्षणं आढळून आली तरीही त्यांची चाचणी होत नाही, असे दिसून आल्याने केंद्र सरकारने हे नवे नियम लागू केले आहेत.
आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन्समध्ये असे म्हटले आहे की, पुढे नमून केलेल्या दोन गटातील व्यक्तींची RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य आहे.- 1. कोरोनाची सर्व लक्षणे (ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास) असूनही अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आलेली व्यक्ती. 2. अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर 2-3 दिवसांत पुन्हा लक्षणे आढळून येणारी व्यक्ती.
अँटीजन टेस्ट निगेटीव्ह येणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची RT-PCR करणे बंधनकारक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने एकत्रितपणे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत. (Coronavirus In India: देशात कोरोना वाढीचा रेकॉर्ड! 24 तासात सापडले 95, 735 नवे रुग्ण, एकुण बाधितांंचा 44,65,864 आकडा वर)
राज्यांना दिलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, अशा लक्षणे आढळणाऱ्या निगेटीव्ह केसेसमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून इतर व्यक्तींना त्याची लागण होऊ नये, याची खात्री करणे गरजेचे आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांना लवकरात लवकर आयसोलेट करणे शक्य होईल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जिल्हा पातळीवर एक देखरेख यंत्रणा उभारण्यास सांगितले असून राज्य पातळीवर समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. या टीमने जिल्हा आणि राज्य पातळीवर केल्या जाणाऱ्या RT-PCR टेस्टची पाहाणी करावी.
कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. सध्या देशात 44,65,864 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 34,71,784 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 9,19,018 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशातील मृतांचा आकडा 75,062 वर पोहचला आहे. दरम्यान दिवसागणित नव्या रुग्णांची मोठी भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी रुग्णांचे वेळीच निदान होणे अत्यंत आवश्यक आहे.