RSS Chief on Manipur: मणिपूर राज्यात शांततेसाठी लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता- मोहन भागवत

हेडगेवार स्मृती भवन येथे आरएसएसच्या 'कार्यकर्ता विकास वर्ग- द्वितीया' या कार्यक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी मणिपूर (Manipur)राज्यात सध्या सुरू असलेल्या समस्या आणि हिंसाचाराकडे लक्ष देण्याची नितांत गरज गरज असल्याचे म्हटले.

Mohan Bhagwat, RSS Chief | Photo Credit - Twitter/ANI)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी वैयक्तिक हल्ले आणि चुकीची माहिती पसरवण्यासह निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या नकारात्मक डावपेच आणि वक्तव्यांवर टीका केली आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आरएसएसच्या 'कार्यकर्ता विकास वर्ग- द्वितीया' या कार्यक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी मणिपूर (Manipur)राज्यात सध्या सुरू असलेल्या समस्या आणि हिंसाचाराकडे लक्ष देण्याची नितांत गरज गरज असल्याचे म्हटले. या राज्यात होणारा हिंसाचार थांबायला हवा, पाठिमागील वर्षभरापासून हे राज्य शांततेची वाट पाहात असल्याचेही ते म्हणाले.

मणिपूरमध्ये शांततेसाठी प्राधान्य आवश्यक

आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, मणिपूरमध्ये 10 वर्षांपूर्वी शांतता होती. तिथे बंदूक संस्कृती संपल्यासारखे वाटले. पण राज्यात अचानक हिंसाचार दिसून आला. सरकारने मणिपूरमधील परिस्थितीला हाताळताना शांततेला प्राधान्य दिले पाहिजे यावर भर दिला आणि देशाच्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवडणूक काळात केल्या जाणाऱ्या नकारात्मक आणि खोट्या वक्तव्यांपासून प्रत्येकाने स्वत:ला दूर ठेवायला पाहिजे असे आवाहन केले. (हेही वाचा, Manipur Chief Minister Security Convoy Ambushed: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यांवर अतिरेकी हल्ला, एक जण जखमी)

निवडणूक एकमत निर्माण करण्याची प्रक्रिया

भागवत यांनी जोर देत म्हटले की, निवडणूक ही एकमत निर्माण करण्याची प्रक्रिया आहे आणि संसद दोन्ही बाजू मांडण्यासाठी एक प्रणाली प्रदान करते. निवडणूक प्रचारादरम्यान परस्पर हल्ले करणे आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवणे याचा त्यांनी निषेध केला. याव्यतिरिक्त, त्यांनी अधिक रचनात्मक राजकीय प्रवचनाला चालना देण्यासाठी "प्रतिपक्ष" (विरोध) हा शब्द "विरोधी" (प्रतिस्पर्धी) ने बदलण्याची सूचना केली. (हेही वाचा, Entire 140 cr Indians are Hindu: भारतातील संपूर्ण 140 कोटी लोक हिंदू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)

एक्स पोस्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा प्रत्येक निवडणुकीत जनमत सुधारण्याचे काम करतो. पण संघ कधीही निवडणूक निकालाच्या विश्लेषणात अडकत नाही. याही वेळी संघने जनमत सुधारण्याचे काम केले. आम्हाला विविध मुद्द्यांवर जनमत घडविण्यासाठी लोक संसदेत निवडून यावे असे वाटते. आमची परंपरा आहे. एकमत विकसीत होते आहे. निवडणूक म्हणजे केवळ स्पर्धा आहे, युद्ध नाही असे सांगतानाच मोहन भागवत म्हणाले, निवडणुकीमध्ये विनाकारण नकारात्मक प्रचार केला जातो. अनेकदा आरएसएससारख्या संघटनांविषयी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन खोटेपणा पसरवला जातो, असेही मोहन भागवत म्हणाले.