RRB NTPC 2024 Recruitment: प्रतीक्षा संपली! आरआरबी एनटीपीसीच्या 11,588 रिक्त पदांसाठी नोटीस जारी, जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया, पगार
यामध्ये प्रथम सीबीटी चाचणी स्टेज 1 घेतली जाईल. यानंतर सीबीटी स्टेज 2 चाचणी होईल.
RRB NTPC 2024 Recruitment: भारतीय रेल्वेच्या सर्वात मोठ्या भरतींपैकी एक असलेल्या RRB NTPC ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या अंतर्गत रेल्वेमध्ये 11,588 पदांवर भरती होणार आहे. रेल्वेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यासाठी रेल्वे भरती मंडळानुसार ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने रोजगार वृत्तपत्रात RRB NTPC भर्ती 2024 ची छोटी सूचना प्रसिद्ध केली आहे. सांगण्यात आले आहे की, पदवी स्तरावरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबरपासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. तर पदवीपूर्व (12वी उत्तीर्ण) स्तरावरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत चालेल.
एकूण पदे-
या भरती मोहिमेद्वारे भारतीय रेल्वेमधील विविध नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदवीधर आणि पदवीपूर्व पदांसाठी 11,558 रिक्त जागा भरल्या जातील. पदवीधर श्रेणी अंतर्गत एकूण 8113 पदे भरण्यात येणार आहेत. अंडर ग्रॅज्युएट श्रेणीतील एकूण 3445 पदे भरली जातील. दोघांच्या नोंदणीच्या तारखाही वेगवेगळ्या आहेत.
कधी करू शकाल अर्ज?
आरआरबी एनटीपीसी पदवीधर पदांसाठी अर्जाची लिंक 14 सप्टेंबर 2024 रोजी उघडेल आणि 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत खुली राहील. पदवीपूर्व म्हणजेच 10 + 2 श्रेणीसाठी अर्जाची लिंक 21 सप्टेंबर 2024 रोजी उघडेल आणि 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत खुली राहील.
पात्रता-
आरआरबी एनटीपीसीच्या पदवीधर रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. यासह, पदवीपूर्व रिक्त पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 + 2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
पदवीधर पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्षे आणि पदवीपूर्व पदांसाठी 18 ते 33 वर्षे वयोमर्यादा आहे.
फॉर्म कुठे भरायचा?
अर्ज फक्त ऑनलाइन असतील, यासाठी उमेदवारांना त्यांच्या प्रदेशाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जेव्हा ऍप्लिकेशन लिंक उघडेल तेव्हा उमेदवार प्रादेशिक आरआरबीच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. (हेही वाचा: IIT Bombay Placements: आयआयटी बॉम्बेचे प्लेसमेंट सत्र संपन्न; केवळ 75% लोकांना मिळाल्या नोकऱ्या, किमान वार्षिक पॅकेज 4 लाखांवर घसरले)
निवड कशी होईल?
पुढील टप्पा टायपिंग कौशल्य चाचणी/संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (पदावर अवलंबून), त्यानंतर दस्तऐवज पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय परीक्षा असेल. निवडीसाठी सर्व टप्पे पार करणे आवश्यक आहे.
किती पगार मिळेल?
पदानुसार वेतन मिळते. उदाहरणार्थ, ट्रेन क्लर्कच्या पदासाठी पगार दरमहा 19,900 रुपये आहे, कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या पदासाठी वेतन 21,700 रुपये आहे. स्टेशन मास्टरचा पगार 35,400 रुपये आहे.
अर्ज फी-
फीबद्दल बोलायचे झाल्यास, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल, त्यापैकी 400 रुपये ते पहिल्या सीबीटीसाठी उपस्थित होताच परत केले जातील. SC, ST, Ex-SM, PwBD, महिला उमेदवारांना फी म्हणून 250 रुपये भरावे लागतील. हे संपूर्ण पैसे परीक्षेला बसल्यानंतर परत केले जातील.