Rolls Royce Crashes: रोल्स रॉयस तेल टँकरला धडकली, भीषण अपघातात 2 ठार
ही घटना नवी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर ( New Delhi-Mumbai expressway) हरियाणा येथील नूह येथे घडली.
आलिशान लिमोझिन - रोल्स रॉयस फॅंटम (Rolls Royce Phantom) पेट्रोल टँकरला धडकून झालेल्या अपघातात दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना नवी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर ( New Delhi-Mumbai expressway) हरियाणा येथील नूह येथे घडली. अपघात घडला तेव्हा रोल्स रॉयस ताशी 230 इतक्या प्रचंड वेगाने चालवली जात होती. ज्यामुळे धडक बसताच मोठा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कारमध्ये असलेले तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गुडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघांपैकी दोघांची नावे दिव्या आणि तस्बी अशी असून ते चंडिगढ येथील तर विकास नामक व्यक्ती दिल्ली येथील असल्याचे समजते. धडकेमध्ये टँकर चालक रामप्रीत आणि त्याचा सहाय्यक कुलदीप हे दोघे ठार झाले.
अपघाताची कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली काही दृश्ये पुढे आली आहेत. त्यामध्ये तब्बल 10 कोटी किंमत असलेल्या रोल्स रॉयस फॅंटमचा काही भाग जळताना दिसतो आहे. वाहनाच्या इंजिनला आग लागल्याने ती आजूबाजूलाही पसरली आहे. कारचे दरवाजे उघडले गेल्याचेही पाहायला मिळते. ज्यामुळे कारमधील तिघांना कसाबसा आपला जीव वाचवता आला.
स्थानिकांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, आग लागताच पुढच्या पाच ते 7 मीनिटांमध्ये आम्ही घटनास्थळी मदत व बचावकार्य करण्याच्या उद्देशाने पोहोचलो. परंतू, तोपर्यंत सर्व संपले होते. कारमध्ये कोणीही नव्हते. वाहने मात्र जळत होती.
Rolls-Royce Phantom हे Rolls-Royce Motor Cars द्वारे निर्मित लक्झरी ऑटोमोबाईल मॉडेल आहे. ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रतिष्ठित लक्झरी कार आहे. जी तिची ऐश्वर्य, कारागिरी आणि खास वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. लक्ष देण्यासाठी ओळखली जाते. फँटम लाइन 1925 पासून उत्पादनात करते आहे. सप्टेंबर 2021 मध्ये तिने अलिकडील सर्वात अद्ययावत अवृत्ती लॉन्च केली. अधिकृत Rolls-Royce वेबसाइट किंवा इतर नामवंत ऑटोमोटिव्ह संतेतस्थळांवरुन आपण या कारबाबत अधिक माहिती मिळवू शकता. अनेकांमध्ये या कारची क्रेझ पाहायला मिळते.