Smriti Irani vs Robert Vadra? प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून अमेठी येथून लोकसभा लढण्याचे संकेत; स्मृती इराणींसोबत लढत होण्याची शक्यता

आपले राजकीय पदार्पण ते अमेठी लोकसभा मतदारसंघातून ( Amethi Lok Sabha Constituency) करण्याची शक्यता आहे.

Robert Vadra | (Photo Credit: X)

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. आपले राजकीय पदार्पण ते अमेठी लोकसभा मतदारसंघातून ( Amethi Lok Sabha Constituency) करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना स्वत: रॉबर्ट वाड्रा यांनीच तसे वक्तव्य केल्याने त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधान आले आहे. वाड्रा यांनी म्हटले की, अमेठीचे लोक सध्याच्या खासदार स्मृती इराणी यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. या मतदारसंघातून गांधी कुटुंबातील प्रतिनिधीनेच पुन्हा एकदा नेतृत्व करावे यासाठी आग्रही आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने याबाब विचार केला आणि खरोखर असे घडले तर रॉबर्ट वाड्रा विरुद्ध स्मृती इराणी (Smriti Irani vs Robert Vadra) अशी लढत पाहायाल मिळू शकते.

एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघात रॉबर्ड वाड्रा यांनी स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून अमेठीचे ऐतिहासिक महत्त्व मान्य करून वाड्रा यांनी सध्याच्या प्रतिनिधित्वासह मतदारांमधील निराशा अधोरेखित केली. त्यांनी विविध राजकीय व्यक्तींशी झालेल्या संवादाचा हवाला दिला. अनेक लोकांनी मला सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिला असेही वाड्रा म्हणाले. (हेही वाचा, Robert Vadra On Rahul Gandhi: राहुल गांधी चांगले नेते, देशाचे भले करतील- रॉबर्ट वाड्रा)

अमेठी मतदारसंघ हा गांधी घराण्यांसाठी प्रतिकात्मकरित्या महत्त्वाचा आहे. हा अनेक वर्षांपासून पारंपरिक बालेकिल्ला आहे. मात्र, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपच्या तत्कालीन उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. ज्यामुळे या मतदारसंघात गांधी घराण्याच्या पारंपरीक वर्चस्वाला धक्का बसला. (हेही वाचा, Lockdown: बायकोला भेटण्यासाठी मारली सायकलवर टांग; उत्तर प्रदेश ते बिहार 600 किलोमीटरचा प्रवास, भलेभलेही अवाक)

वाड्रा यांनी राजकीय प्रवेसाचा केलेला विचार अभूतपूर्व नाही. एप्रिल 2022 मध्येही त्यांनी त्याबाबत एक विधान केले होते. तेव्हाही ते म्हणाले होते की, जनतेला त्यांचे प्रतिनिधित्व हवे असल्यास त्यांची तयारी आहे. आगामी काळात राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा त्यांनी तेव्हाच व्यक्त केली. लोकांची सेवा करण्याची आणि बदल घडवून आणण्याची आपली वचनबद्धता ठामपणे सांगून, वाड्रा यांनी सार्वजनिक सेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचा विचारही बोलून दाखवला.

व्हिडिओ

रॉबर्ट वाड्रा यांनी पुढे म्हटले आहे की, मी संसद सदस्य व्हायचे ठरवले तर मी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करावे अशी अमेठीच्या जनतेची अपेक्षा आहे. रायबरेली, अमेठीमध्ये गांधी कुटुंबाने अनेक वर्षे कठोर परिश्रम केले. सुलतानपूर, अमेठीचे लोक सध्याच्या खासदारामुळे त्रस्त आहेत, त्यांना वाटते की त्यांना निवडून देऊन त्यांनी चूक केली आहे. त्यामुळे ते चांगल्या आणि आगोदरच्या खासदारांच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, वाड्रा यांना खरोखरच काँग्रेस मैदानात उतरवणार का, याबाबत उत्सुकता आहे.