Delhi Police: दिल्ली येथे अटक करण्यात आलेला दहशतवादी निघाला लष्कराचा निवृत्त कर्मचारी: पोलीस

दिल्ली पोलिसांनी रविवारी, ४ फेब्रुवारी रोजी लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba ) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून रियाझ अहमद याल नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अटक (Retired Army Soldier Arrested) केली.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

दिल्ली पोलिसांनी रविवारी, ४ फेब्रुवारी रोजी लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba ) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून रियाझ अहमद याल नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अटक (Retired Army Soldier Arrested) केली. धक्कादायक म्हणजे हा दहशतवादी लष्करातील निवृत्त शिपाई असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

कुपवाडा जिल्ह्यात एलईटी मॉड्यूल नष्ट

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्यात एलईटी मॉड्यूल नष्ट केले आणि या भागातील संभाव्य हल्ल्यांच्या योजनांना हाणून पाडले. यावेळी काही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी अहमद खुर्शीद अहमद राथेर आणि गुलाम सरवर राथेर या दोन साथीदारांसह, शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडे हँडलरशी सहयोग केल्याचा आरोप आहे.

दिल्ली पोलिसांकडून निवेदन जरी

दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात, त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये विध्वंसक कारवाया करण्यासाठी एलईटीच्या कार्यकर्त्यांनी रचलेल्या एलओसी ओलांडून शस्त्रे आणि दारूगोळा मिळविण्याच्या कटात अहमदच्या सक्रिय सहभागाची पुष्टी केली. पोलिसांनी केलेली कारवाई ही दहशतवाद मोडीत काढण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे

अलीकडील काळातील मोठी कारवाई 

ही अटक जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अलीकडील काळातील मोठी कारवाई मानले जात आहे. प्राप्तमाहितीनुसार पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून कार्यरत असलेले दहशतवादी मॉड्यूल नष्ट करण्यात आले आहे. अहमदच्या अटकेपूर्वी, जहूर अहमद भटसह पाच जणांना विविध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तस्करीत सहभाग असल्याबद्दल कर्नाह येथे ताब्यात घेण्यात आले होते. एके सिरीज रायफल, मॅगझिन, राऊंड आणि पिस्तूल ताब्यात सापडलेल्या भटला त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठिंबा देण्यासाठी शस्त्रास्त्रे पाठवण्यासाठी जबाबदार असलेल्या दोन पीओके-आधारित एलईटी हँडलर्सचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखला गेला.