Retail Inflation in January 2024: दिलासादायक! किरकोळ महागाई दर जानेवारी 2024 मध्ये 5.10 टक्क्यांवर

जानेवारीमध्ये डाळींचा महागाई दर 19.54 टक्के होता, जो डिसेंबर 2023 मध्ये 20.73 टक्के होता. भाज्यांच्या महागाई दरातही किंचित घट झाली असून डिसेंबरमधील 27.64 टक्क्यांवरून तो 27.03 टक्क्यांवर आला आहे.

Retail Inflation in January 2024: दिलासादायक! किरकोळ महागाई दर जानेवारी 2024 मध्ये 5.10 टक्क्यांवर
Inflation | (Photo Credits: ANI)

Retail Inflation in January 2024: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात मोदी सरकार आणि आरबीआयकडून दिलासा देणारी बातमी आली आहे. किरकोळ चलनवाढीचा (Retail Inflation) दर जानेवारी 2024 मध्ये 5.10 टक्क्यांवर आला आहे, जो डिसेंबर 2023 मध्ये 5.69 टक्के होता. डिसेंबर 2023 च्या तुलनेत जानेवारी 2024 मध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दरही कमी झाला आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये 8.30 टक्के होता, जो डिसेंबर 2023 मध्ये 9.53 टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाने जानेवारी महिन्यातील किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दरात घट झाली असली तरी पालेभाज्या आणि भाज्यांची महागाई चिंतेचे कारण आहे.

पालेभाज्यांचा भाव 25 टक्क्यांच्या वर, तर डाळींचा भाव 20 टक्क्यांच्या जवळपास आहे. यामुळे जानेवारी 2024 मध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 8.30 टक्के राहिला आहे. डिसेंबर 2023 च्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये डाळींच्या महागाईत किंचित घट झाली आहे.

जानेवारीमध्ये डाळींचा महागाई दर 19.54 टक्के होता, जो डिसेंबर 2023 मध्ये 20.73 टक्के होता. भाज्यांच्या महागाई दरातही किंचित घट झाली असून डिसेंबरमधील 27.64 टक्क्यांवरून तो 27.03 टक्क्यांवर आला आहे. धान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दरही कमी झाला आहे. डिसेंबरमध्ये तो 9.93 टक्के होता, जो आता 7.83 टक्के आहे. फळांच्या महागाईचा दरही कमी झाला असून, तो 8.65 टक्के झाला आहे, जो डिसेंबर 2023 मध्ये 11.14 टक्के होता. (हेही वाचा; Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 9,000 जागांसाठी पदभरती)

दरम्यान, सध्या किरकोळ महागाई 5 टक्क्यांच्या आसपास खाली आली आहे आणि ती आरबीआयच्या सहनशीलतेच्या कक्षेत आहे. मात्र महागाई दर 4 टक्क्यांवर आणण्याचे आरबीआयचे लक्ष्य आहे. याआधी 8 फेब्रुवारी 2024 रोजी, आरबीआयने 2024 साठी पहिले आर्थिक धोरण जाहीर केले. आरबीआयच्या मते, 2024-25 मध्ये महागाई दर 4.5 टक्के असेल. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाईचा दर अन्नधान्याच्या चलनवाढीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असेल. दास यांच्यामते जागतिक तणावामुळे केवळ पुरवठ्याच्या समस्याच नाहीत, तर कच्च्या तेलाच्या किमतीतही चढ-उतार दिसून येत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2024 07:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).