रेस्टॉरंट मध्ये विक्री करण्यात येणाऱ्या चायनीज खाद्यपदार्थांवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा- केंद्रीय मंत्री रामदास आठवले
त्यामुळेच आता मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी चीनच्या प्रोडक्ट्सवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. आठवले यांनी सरकारला चायनीज खाद्यपदार्थ आणि त्या संदर्भातील हॉटेल्स सुद्धा बंद करण्याबाबत म्हटले आहे.
भारत-चीन संघर्षामध्ये भारताच्या 20 जवानांना वीरमण आले आहे. त्यामुळेच आता मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी चीनच्या प्रोडक्ट्सवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. आठवले यांनी सरकारला चायनीज खाद्यपदार्थ आणि त्या संदर्भातील हॉटेल्स सुद्धा बंद करण्याबाबत म्हटले आहे. तसेच सीमेवर शहीद झालेल्या 20 जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये असे ही म्हटले आहे.(Boycott Of Chinese Goods: चीनी प्रोडक्ट्सवर बॉलिवूडसह क्रिडा क्षेत्राने बहिष्कार टाकण्याचे CAIT यांचे आवाहन)
आठवले यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, चीन हा फसवणूक करणारा देश आहे. भारतात चीनच्या सर्व वस्तुंवर बहिष्कार टाकला पाहिजे. चायनीज फूड आणि त्याचे हॉटेल्स बंद केले पाहिजे. त्याचसोबत नागरिकांनी सुद्धा चायनीज फुड्सवर बहिष्कार टाकावा असे ही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.(Galwan Valley: 1962 मध्ये सुद्धा गलवान व्हॅली भागात चीन ने भारताला दिला होता धोका, आज झाली पुनरावृत्ती, वाचा सविस्तर)
रामदास आठवले यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली देत असे म्हटले आहे की, लद्दाखच्या गलवान घाटाच्या सीमेवर चीन सोबत झालेल्या संघर्षात 20 जवान शहीद झाले आहेत. वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली त्यांनी वाहिली आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसून त्यांच्या परिवारासोबत भारत सरकारसह देशातील नागरिक पाठीशी असणार असल्याचे ही आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एलएसीवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार, चीनचे सुद्धा 40 पेक्षा अधिक जवान मारले गेले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोक सातत्याने चीनच्या वस्तूंचा विरोध करत आहे. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाहीत असे म्हटले आहे.