दहशतवाद्यांनी जवानाचे घरातून अपहरण केले नसल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
मात्र संरक्षण मंत्रालयाने शनिवारी याबाबत स्पष्टीकरत देत जवानाचे अपहरण झाले नसल्याचे सांगितले आहे.
भारताच्या लष्करातील जवान मोहम्मद यासीन याचे घरात घुसून दहशतवाद्यांनी शुक्रवारी (8 मार्च) अपहरण केल्याचे सांगितले जात होते. मात्र संरक्षण मंत्रालयाने शनिवारी याबाबत स्पष्टीकरत देत जवानाचे अपहरण झाले नसल्याचे सांगितले आहे. तसेच जवान सुखरुप आहे असे ही म्हटले आहे.
जवान मोहम्मद यासीन याचे काल बडगाम येथून अपहरण झाल्याचे प्रसारमाध्यमांच्यावतीने सांगितले जात होते. तर आधीच ग्रेनेड हल्ला जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) मध्ये झाल्याने तणावाची परिस्थिती होती.मात्र हे वृत्त चुकीचे असून याबाबत कोणाही अंदाज व्यक्त करु नका असे संरक्षण मंत्रालयाकडून आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी यासीन याचे शुक्रवारी अपहरण केल्याचे वृत्त समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. तर यासीन लष्करातील हा जाकली युनिटचा सदस्य आहे. मात्र अपहरण झाले असल्याच्या वृत्तानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. परंतु संरक्षण मंत्रालयाने याबद्दल स्पष्टीकरण देत वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे.