किराणा दुकाने आता डिजिटल पद्धतीची होणार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडून प्रयत्न सुरु
देशातील किराणा दुकाने (Kirana Shops) आता डिजिटल पद्धतीत रुपतांतर करण्यासाठी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स (Reliance) समूहाकडून प्रयत्न केले जात आहेत.
देशातील किराणा दुकाने (Kirana Shops) आता डिजिटल पद्धतीत रुपतांतर करण्यासाठी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स (Reliance) समूहाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे घाऊक बाजारपेठ्यांमधील दुकाने ऑनलाईन पद्धतीने झाल्यास त्याची संख्या 15 हजारावरुन येत्या 2023 पर्यंत 50 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या किरकोळ बाजारपेठांमधील उलाढाल ही 700 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. त्यामधील 90 टक्के वाटा हा असंघठीत क्षेत्राचा आहे. याबद्दल बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.(मुकेश अंबानी आता खेळणी विकणार, कोट्यवधी रुपयात केला 'हॅमलेज' या ब्रिटिश कंपनीशी करार)
त्यासाठी ऑनलाईन ते ऑफलाईन ई-कॉमर्स तयार करण्याचा प्रयत्न रिलायन्सकडून करण्यात येत आहे. त्याचसोबत गल्लीगल्लीतील किराणा दुकाने ही जिओ मोबाईल पॉइंट ऑफ सेलने त्यांच्या 4G नेटवर्कला जोडण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. याचा उपयोग ग्राहकांना होणार असल्याचे म्हटले जात आहे.