Reels Impact on Sales In India: भारतातील 77 टक्के लोक Facebook आणि Insta वर रील्स पाहून उत्पादने खरेदी करतात; सर्वेक्षणात मोठा खुलासा
कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क, मीशो, नवी, मारुती नेक्सा, स्निच, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि तनिष्क यांसारख्या ब्रँडसाठी चालवलेल्या मोहिमेत असे दिसून आले की, लोक जाहिराती आणि रील्स पाहून उत्पादने खरेदी करतात.
Reels Impact on Sales In India: सोशल मीडियाचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. लोक त्यांच्या रोजच्या दिवसातील बराचसा वेळ सोशल मिडियावर व्यतीत करत असतात. याच्याशीच निगडीत भारतात उत्पादन खरेदी करण्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील पाहून लो मोठ्या प्रमाणावर उत्पादने खरेदी करत आहेत. मेटाने मंगळवारी #MadeonReels लाँच केल्याची घोषणा केली. रील्स जाहिरातींचे जर सामर्थ्य आहे ते देशातील ब्रँडपर्यंत नेण्यासाठी हा कार्यक्रम डिझाइन केलेला आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट रीलमधील मनोरंजक कथाकथनाद्वारे ब्रँड्सना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास सक्षम करणे हा आहे. कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क, मीशो, नवी, मारुती नेक्सा, स्निच, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि तनिष्क यांसारख्या ब्रँडसाठी चालवलेल्या मोहिमेत असे दिसून आले की, लोक जाहिराती आणि रील्स पाहून उत्पादने खरेदी करतात. निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, रील्स पाहिल्यानंतर लोक ब्रँडचे अनुसरण करतात किंवा अगदी खरेदीही करतात. भारतातील सर्वेक्षण केलेल्या 82 टक्के लोकांनी रील्स पाहिल्यानंतर व्यवसायाचा पाठपुरावा केल्याचे सांगितले आणि 77 टक्के लोकांनी रील्स पाहिल्यानंतर उत्पादन किंवा सेवा खरेदी केल्याचे सांगितले. (हेही वाचा: कर्नाटक सरकार सोबतच्या MoU नंतर Bengaluru Airport जवळ Foxconn ने खरेदी केली 300 एकर जमीन)
Facebook, Instagram Reels: 77% of People Surveyed in India Have Purchased a Product or a Service After Watching Reels, Finds Meta Study#Facebook #Instagram #InstagramReels #Meta https://t.co/q9L7L9opsJ
— LatestLY (@latestly) May 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 07:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

