Rashmika Mandanna's Deepfake Video: रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मेटाकडून मागवली माहिती

व्हिडिओमध्ये, काळ्या वर्कआउट ड्रेसमध्ये ब्रिटिश-भारतीय इनफ्य्लूएंसर महिलेचा फेस एडीट केला गेला आणि बॉलीवूड अभिनेत्रीचा चेहरा तिझ्या जागी लावला.

Rashmika-Mandanna | File Image

दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक एआय-आर्टिफीशियल व्हिडिओच्या संदर्भात गुन्हा नोंदवल्यानंतर, प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ तयार करणाऱ्या खात्याच्या URL चे तपशील मिळवण्यासाठी मेटाला निर्देश दिले आहेत. मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये, काळ्या वर्कआउट ड्रेसमध्ये ब्रिटिश-भारतीय इनफ्य्लूएंसर महिलेचा फेस एडीट केला गेला आणि बॉलीवूड अभिनेत्रीचा चेहरा तिझ्या जागी लावला. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करणाऱ्या लोकांची माहितीही मागवली आहे. (हेही वाचा - Pune Crime News: पुण्यातील डीमार्टमध्ये धक्कादायक प्रकार, दोन महिलांची पर्स चोरीला,गुन्हा दाखल)

वृत्तसंस्था पीटीआयने तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, ज्या खात्यातून व्हिडिओ तयार करण्यात आला होता त्या खात्याच्या URL आयडीमध्ये प्रवेश करण्यासाठी आम्ही मेटाला पत्र लिहिले आहे.

शुक्रवारी, भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 465 (बनावट) आणि 469 (प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 66C (ओळख चोरी) आणि 66E (गोपनीयतेचे उल्लंघन) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आ.दिल्ली महिला आयोगाने (DCW) देखील शहर पोलिसांना नोटीस पाठवून इंटरनेटवर व्हिडिओ तयार आणि शेअर करण्यात गुंतलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.