Ranjit Singh Murder Case: डेरा सच्चा सौदा चे Gurmeet Ram Rahim रणजीत सिंहच्या हत्या प्रकरणामध्ये दोषी; हरियाणा सीबीआय स्पेशल कोर्टाचा निर्णय

पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग आणि इतर 4 आरोपींना IPC 302 अंतर्गत हत्येचे दोषी ठरवले आहे.

आरोपी राम रहीम ( File Photo)

डेरा सच्चा सौदा ( Dera Sacha Sauda) चे प्रमुख राम रहीम सिंह (Gurmeet Ram Rahim) ला रणजीत सिंहच्या हत्या प्रकरणामध्ये (Ranjit Singh Murder Case) दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये राम रहीम सिंह सोबतच अन्य 4 जणांना देखील दोषी ठरवण्यात आलं आहे. रणजीत सिंह हा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमचा समर्थक होता. 10 जुलै 2002 रोजी त्याची हत्या झाली होती. यामध्ये सीबीआय ने 3 डिसेंबर 2003 ला एफआयआर नोंदवला आहे. रणजीत सिंहचा मुलगा जगसीर सिंह याने न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी 12 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाणार आहे.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग विरोधातील खुनाचा खटला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून इतर कोणत्याही सीबीआय न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. आता पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग आणि इतर 4 आरोपींना IPC 302 अंतर्गत हत्येचे दोषी ठरवले आहे. नक्की वाचा: Gurmeet Ram Rahim Case Verdict: पत्रकाराच्या हत्येप्रकरणी बाबा राम रहीम यांना जन्मठेप.

ANI Tweet

सध्या गुरमीत राम रहीम सिंह रोहतक मधील सुनारिया तुरुंगामध्ये आहे. दोन महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये त्याला 2018 साली 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.