Ram Temple Construction in Ayodhya: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथील राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी होणार- रिपोर्ट्स

आयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरांचे भूमीपूजन 3 किंवा 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची शनिवारी या संदर्भात बैठक पार पडली.

Ayodhya Shri Ram Janmabhoomi Mandir (Photo Credits: Twitter)

आयोध्या (Ayodhya) येथे उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरांचे भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार असल्याची माहिती रिपोर्ट्सद्वारे समोर आली आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची (Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) शनिवारी (18 जुलै) या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र भूमिपूजन नेमकं कोणत्या दिवशी करायचं याचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात येणार आहे.

भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केल्याचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या गोविंद महाराज यांनी सांगितले आहे. "आम्ही लोकांना 29 जुलै आणि 5 ऑगस्ट या दोन तारखा सुचवल्या आहेत. भूमीपूजनाचा कार्यक्रम हा नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीच होईल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भूमीपूजन झालेले असेल," असे गोविंद महाराज यांनी सांगितले. (अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट तर्फे आजपासून रामल्लाच्या ऑनलाईन दर्शनाला सुरुवात; फेसबुक, ट्विटर द्वारे घेता येणार लाईव्ह आरतीत सहभाग)

AIR News Pune Tweet:

यापूर्वी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट या दोन तारखा सूचवल्या होत्या. शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनी सांगितले की, "तीन ते साडेतीन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्याचप्रमाणे नवीन बांधण्यात येणाऱ्या राममंदिराची उंची ही 161 फूट असून त्यात 5 घुमट असतील." दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये केंद्र सरकारला अयोद्धा मधील राम मंदिरासाठी जागा दिली होती आणि या मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now