राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या किंमतीत घोटाळा झाल्याचा आरोप, सीबीआय तपास करण्याची मागणी

समाजवादी पक्षाच्या सरकारमधील राज्य मंत्री राहिलेल्या तेज नारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी अध्योत राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनीबद्दल घोटाळा झाल्याचा आरोप लावला आहे.

Ram Mandir, Ayodhya (Credits: Twitter)

समाजवादी पक्षाच्या सरकारमधील राज्य मंत्री राहिलेल्या तेज नारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी अध्योत राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनीबद्दल घोटाळा झाल्याचा आरोप लावला आहे. पवन पांडे यांनी रविवारी मीडियासोबत बातचीत करताना असे म्हटले की, 2 कोटी रुपयांची जमिनीची किंमत त्याच दिवशी 18 कोटी रुपयांची झाली. त्या संबंधित एक करार सुद्धा झाला. त्यामध्ये ट्रस्टी अनिल मिश्री आणि महापौर ऋषिकेश उपाध्याय हे साक्षीदार आहेत.

सपा नेता पांडे यांनी म्हटले की, 18 मार्च 2021 रोजी जवळजवळ 10 मिनिटांनंतर एक करार झाला. तेव्हा 2 कोटी रुपयांचा करार हा 18 कोटी रुपये कसा झाला? तर खासदार संजय सिंह यांनी राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीचा घोटाळा झाल्याचा आरोप ही पांडे लावला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय किंवा ई़डी तपास व्हायला पाहिजे.(Uttar Pradesh Hand Pump Dispute: उत्तर प्रदेशमध्ये हातपंप ठरला वादग्रस्त, राजकारणही रंगले)

Tweet: 

Tweet: 

सध्या मंदिर ट्रस्टने जमिन खरेदीत घोटाळा केल्याच्या आरोपांवर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी असे म्हटले की, लोक गेल्या 100 वर्षांपासून आमच्यावर आरोप लावत आहेत. आमच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा सुद्धा आरोप लावला आहे. आम्हाला अशा प्रकारच्या आरोपांची पर्वा नाही आहे. आम्ही त्याचा अभ्यास करुन आणि नंतर उत्तर देऊ.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif