Rajasthan: स्विमिंग पूलमध्ये 6 वर्षांच्या मुलासमोर पोलीस अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबलचे अश्लील कृत्य; Dirty Video व्हायरल, डीएसपीला अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अजमेरमधील (Ajmer) एक पोलीस अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ज्या वेळी पोलीस अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबल आपल्या अश्लील कृत्यामध्ये मश्गुल होते त्या वेळी त्या महिलेचा 6 वर्षांचा मुलगाही तेथे उपस्थित होता. या मुलाला पाहूनही पोलीस अधिकाऱ्याने अश्लील हावभाव केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला कॉन्स्टेबलच्या पतीने विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर विभागाने त्यांच्यावर कारवाई करून दोघांना निलंबित केले आहे.

आता माहिती मिळत आहे की, या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्याचे नाव हिरालाल सैनी असून तो अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथे डीएसपी पदावर तैनात होता, तर महिला कॉन्स्टेबल जयपूर आयुक्तालयात तैनात होती. एक महिन्यापूर्वी त्यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासानंतर डीएसपीला निलंबित केले गेले. आता बाल अश्लीलता रोखण्यासाठीच्या टीमने या निलंबित डेप्युटी एसपीला अटक केली आहे.

गुरुवारीच डीएसपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर डीएसपी उदयपूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसओजी टीमने त्याला उदयपूरच्या अनंता रिसॉर्टमधून अटक केली. हिरालाल सैनीला अटक केल्यानंतर प्रथम त्याला उदयपूरच्या अंबामाता पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीसाठी आणण्यात आले. त्यानंतर कागदोपत्री काम पूर्ण केल्यानंतर एसओजीची टीम डीएसपीसह जयपूरला रवाना झाली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता गृह विभागाने एसओजीला चौकशीच्या निर्णयाचे आदेश दिले होते. (हेही वाचा: धक्कादायक ! हैदराबादमध्ये 6 वर्षाच्या मुलीवर शेजारच्याने केला बलात्कार, अत्याचारानंतर मुलीचा मृतदेह बेडशीटमध्ये ठेवला लपवून)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये 6 वर्षांचा एक मुलगाही दिसत असल्याने, एसओजीच्या चाईल्ड पोर्नोग्राफी टीमकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात होती. महिला कॉन्स्टेबलने हा व्हिडीओ तिच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटसवर ठेवला होता, तिथून तो व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओच्या आधारे महिला कॉन्स्टेबलच्या पतीने दोघांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती.