Asaram Bapu: आसाराम बापू याचा मुक्कम तुरुंगातच! बरे होताच कारागृहात हजर करण्याचे कोर्टाचे आदेश, जामीन याचिकाही फेटाळली
न्यायमूर्ती संदीप मेहता आणि देवेंद्र कछवाह यंच्यासमोर ही सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने म्हटले की, हे निश्चित करण्यात यावे की आसाराम याला योग्य उपचार, आहार आणि वातावरण मिळावे.
बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या आसाराम बापू (Asaram Bapu) याला राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan High Court) जोरदार दणका दिला आहे. आसाराम बापू याने आपल्या आरोग्याचे कारण पुढे करत न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता. परंतू, वैद्यकीय उपचार घेऊन बरे वाटल्यांनतर आसाराम बापू याला पुन्हा तुरुंगात दाखल करा असे आदेश देत उच्च न्यायालयाने आसाराम बापू याची याचिका फेटाळून लावली. आसाराम बापू याचे वाढते वय लक्षात घेता आणि त्याच्यावर सुरु असलेल्या वैद्यकीय उपचार, आहार आणि सुरक्षीतता याबाब अधिक काळजी घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने म्हटले की, जोधपूर येथील एम्स रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या मेडीकल रिपोर्ट्सच्या आधारे आसारमा बापू याला वैद्यकीय उपचार पुरविण्यात यावेत. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि देवेंद्र कछवाह यंच्यासमोर ही सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने म्हटले की, हे निश्चित करण्यात यावे की आसाराम याला योग्य उपचार, आहार आणि वातावरण मिळावे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आसारामबापू याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जात म्हटले होते की, त्याला अनेक आजार आहेत. त्यावर तो अॅलोपॅथीक पद्धतीने उपचार करु इच्छितो. आसाराम याचे म्हणने होते की, त्याला आश्रमात राहण्याची संधी दिली जावी. तेथे ते आपल्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतील. आसाराम याचे वकील जे एस चौधरी यांनी म्हटले की, त्यांना जोधपूर येथील पाल गावात आपल्या आश्रमात राहायला मिळावे. त्यांना आपल्या अनुयायांकडून आणखी वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी परवानगी मिळावी. (हेही वाचा, Asaram Bapu Seeks Interim Bail: कोविड 19 पॉझिटीव्ह आसाराम बापू याची कोर्टाकडे आंतरिम जामीनासाठी मागणी)
आसाराम बापू याच्या वकिलाने म्हटले की, त्यांची शिक्षा निलंबीत करण्यात यावी. त्यासाठी ते काही अटीही स्वीकारायला तयार आहेत. दरम्यान, न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम यांची मागणी कोर्टाने फेटाळी. न्यायालायने आसारामची मागणी फेटाळून लावत म्हटले की, त्याला आतड्याची समस्या आहे. मेडीकल रिपोर्ट्सनुसार त्याची स्थिती सध्या ठिक आहे. तसेच, या समस्येवर इलाज जोधपूर येथील एमडीएम रुग्णालयातही उपलब्ध आहे. त्याशिवाय शिक्षेतील निलंबनाबाबत गुजरात न्यायालयातही आसारामबापूवर एक खटाल सुरु आहे. यातही ते बलात्काराचेच आरोपी आहेत. त्यामुळे त्यांची सजा निलंबीत होऊ शकत नाही.