राजस्थान: दुसरे लग्न करण्यासाठी भाड्याने आणले आई-वडील, पोलिसात तक्रार दाखल

राजस्थान (Rajashthan) येथे एका इसमाने दुसरे लग्न करण्यासाठी चक्क खोटे आई-वडील आणल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook)

राजस्थान (Rajashthan) येथे एका इसमाने दुसरे लग्न करण्यासाठी चक्क खोटे आई-वडील आणल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच लग्नामध्ये भाड्यावर आणलेली मंडळी खोटी वाटू नयेत म्हणून त्यांना आपला परिवार आणि मित्रपरिवार असल्याची त्याने नवरीच्या घरातील मंडळींना पटवून दिले.

इम्रान भाटी असे या इसमाचे मूळ नाव आहे. मात्र दुसरा विवाह करण्यासाठी त्याने कबीर शर्मा अशी ओळख सांगितली होती. तसेच विवाहाच्यावेळी नवरीकडच्या मंडळींनी इम्रान याला लाखो रुपयांचे दागिने, भेटवस्तू आणि रोकड दिली. मात्र एवढ्यावर या नवरदेवाने समानधन न मानत नवरीच्या घरातसुद्धा डल्ला मारत पळ काढला. या प्रकरणी आरोपी इम्रान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(मध्य प्रदेश: लग्न लावून दिलेल्या भटजीसोबतच पळाली नवरी, लाखो रुपयांचे दागिने लांबवले)

तसेच नवरीच्या वडिलांना इम्रानचा खोटारडेपणा कळला तेव्हा त्यांनी तातडीने याबद्दल पोलिसात धाव घेतली. त्याचसोबत इम्रान याचे यापूर्वी लग्न झाले असून त्याला तीन मुले सुद्धा असल्याचे नवरीच्या वडिलांनी पोलिसात सांगितले आहे.