भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसल्याचा संशय, देशभरात हाय अलर्ट जाहीर

त्यामुळे देशभरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतात (Indian)  पाकिस्तानच्या (Pakistan) आयएसआय (ISI) च्या  एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे देशभरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी अफगाणिस्ताच्या पासपोर्टचा वापर करत भारतात आल्याचे सांगण्यात येत आहे.

राजस्थान मधील पोलिस अधिक्षक यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. आयएसआयचा एक एजंट आणि चार दहशतवादी भारताच्या सीमेत घुसले आहेत. त्यामुळे सर्व पोलिसांना याबाबत एक पत्रक पाठवून सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गर्दीचे ठिकाण, रेल्वे स्थानक, बस स्थानकांसह अन्य महत्वाच्या ठिकाणी सुरक्षायंत्रणेत अधिक वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत संशयित वाहने आणि व्यक्तींवर नजर ठेवण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.(जम्मू-कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत, जवानांना हाय अलर्ट जाहीर)

ANI ट्वीट:

यापूर्वी सुद्धा 15 ऑगस्ट आणि बकरी इदच्या दिवशी देशभरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता. कारण मोदी सरकारने जम्मू-कश्मीर बाबत घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानची जळफळाट होत आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या हल्लाची पूर्वसुचना जाहीर करत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर मुंबईत सुद्धा पाच प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षितेत मोठी वाढ करण्यात आली आहे.