सचिन पायलट यांच्यासहित 18 काँग्रेस सदस्यांना पक्षाकडून नोटीस; उत्तरासाठी दोन दिवस वाट पाहणार

दोन दिवसात उत्तर न दिल्यास त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पद आणि सदस्यत्व सोडल्याचे समजले जाईल असे राजस्थान काँग्रेस (Rajsthan Congress) प्रभारी अविनाश पांडे (Avinash Pandey) यांनी सांगितले.

सचिन पायलट (Photo-PTI)

सचिन पायलट (Sachin Pilot)  यांच्यासहित काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीला (Congreas Legislative Meeting) उपस्थित नसलेल्या 18 सदस्यांना पक्षाकडून नोटीस धाडण्यात आली आहे. दोन दिवसात उत्तर न दिल्यास त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पद आणि सदस्यत्व सोडल्याचे समजले जाईल असे राजस्थान काँग्रेस (Rajsthan Congress) प्रभारी अविनाश पांडे (Avinash Pandey) यांनी सांगितले आहे. सचिन पायलट यांना देव शहापपणा देवो, त्यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करु नये. आपली चूक मान्य करावी. सचिन पायलट यांना चर्चा करण्यासाठी दरवाजे नेहमी खुले होते, आजही आहेत. पण आता गोष्टी फार पुढे गेल्या आहेत. आता चर्चेचा सुद्धा काही फायदा होणार नाही,” असंही अविनाश पांडे यांनी ANI शी बोलताना म्हटलं आहे. Rajasthan Political Crisis: 'भाजप सोबत जाणार नाही' म्हणणारे सचिन पायलट कसे करणार पॉलिटिकल लँडिंग?

राजस्थान काँग्रेस तर्फे काल सचिन पायलट यांचे उपमुख्यमंत्रीपद, राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले होते. विधिमंडळ बैठकीत एकूण 102 सदस्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला होता, या बैठकीला सचिन पायलट यांच्या सह नोटीस पाठवलेले 18 सदस्य अनुपस्थित होते.

ANI ट्विट

(हेही वाचा, Rajasthan Political Crisis: पायलट नसताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राजस्थान काँग्रेस सरकारचे विमान अस्थिर)

दुसरीकडे, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सुद्धा सचिन पायलट यांच्यावर टीका करत त्यांनी आपल्या वयानुसार किंचित संयम बाळगायला हवा होता असे मत व्यक्त केले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, कॅबिनेट मंत्री अशी सगळी पदे दिली होती, अजूनही ते तरुण आहेत त्यामुळे पुढे पद मिळवण्यासाठी थोडा संयम बाळगायाला हरकत नव्हती असेही सिंह यांनी म्हंटले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, राजस्थान मध्ये सत्तासंघर्ष निर्माण केल्यावर आता सचिन पायलट काँग्रेसची कास सोडून भाजपची वाट धरणार का सहा चर्चा सुद्धा सुरु होत्या मात्र काही वेळेपूर्वीच पायलट यांनी आपण भाजप मध्ये प्रवेश घेणार नाही निश्चित असल्याचे सांगितले आहे. मात्र यात आता पुढे पायलट नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif