Rajasthan: राजस्थानमध्ये रस्ते अपघातात 6 भाविक ठार, 20 पेक्षा अधिक जखमी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रेलर यांच्यात धडक झाल्याने हा अपघात घडला.

Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राजस्थान (Rajasthan) राज्यातील पाली जिल्ह्यात (Pali District) झालेल्या एका रस्ते अपघातात (Road Accident) 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रेलर यांच्यात धडक झाल्याने हा अपघात घडला. भाविक ट्रॅक्टर ट्रॉलित बसले होते. हे सर्व भाविक रामदेवरा येथून पालीला परतत होते.

सुमेरपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख रामेश्वर भाटी यांनी सांगितले की, अपघातामध्ये 6 जण ठार झाले आहेत. तर, 20 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयानेही या घटनेबद्दल दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh Accident: चालकाचा बसवरील ताबा सुटला; प्रवाशांनी भरलेली भरधाव गाडी पेट्रोल पंपावर आदळली (See Shocking Video))

ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थान राज्यातील पाली येथे झालेला भाविकांचा अपघात अत्यंत दु:खदायक आहे. दु:खाच्या या अशा कठीण समयी माझ्या भावना शोकदग्ध कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींना लवकर आराम पडावा अशी मी प्रार्थना करतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif