E-Catering, चादर, ब्लॅंकेट शिवाय सुरू होणार 12 मे पासून भारतात प्रवासी रेल्वे सेवा; Aarogya Setu App वापरा: रेल्वे मंत्रालयाच्या प्रवाशांना सूचना
यामध्ये प्रवाशांना केटरिंग सर्व्हिस मिळणार नाही तसेच चादर, ब्लॅंकेट मिळणार नसल्याचं भारतीय रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
भारतामध्ये 12 मे पासून देशभरातील 15 शहरांमध्ये प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा रेल्वे सरकारचा प्रयत्न आहे.उद्यापासून सुरू होणार्या प्रवासी वाहतूकीसाठी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली बजावल्यानंतर आता भारतीय रेल्वेनेही खाण्या-पिण्याची सोय ते इतर सुविधांबद्दल माहिती स्पष्ट केली आहे. यामध्ये प्रवाशांना केटरिंग सर्व्हिस मिळणार नाही तसेच चादर, ब्लॅंकेट मिळणार नसल्याचं भारतीय रेल्वेने स्पष्ट केलं आहे. मात्र प्रवाशांना कोव्हिड 19 पासून सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकारचं आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेच्या 12 मे पासून सुरू होणार्या प्रवासी वाहतूकीसाठी अशी असेल नियमावली.
दरम्यान रेल्वेच्या कॅटरिंग सेवेचे पैसे रेल्वेच्या तिकिटामध्ये नसतील. मात्र IRCTC कडून मर्यादीत प्रमाणात खाद्य पदार्थ आणि पॅकेज्ड पाणी पैसे आकारून उपलब्ध करून दिले जाऊ शकते. दरम्यान प्रवाशांनी स्वतः प्रवासादरम्यान खाण्याचे पदार्थ आणि पिण्याचे पाणी बाळगावं असं आवाहन देखील केलं आहे. तसेच प्रवासात चादर, ब्लॅंकेट दिले जाणार नसल्याने त्याचीदेखील सोय प्रवाशांनाच करावी लागणार आहे. Indian Railways कडून 15 पॅसेंजर रेल्वे गाड्या 12 मे पासून धावणार पहा irctc.co.in वर त्याचं E-Tickets कसं बुक कराल?
ANI Tweet
दरम्यान मंगळवार, 12 मे पासून सुरू होणार्या प्रवासी वाहतूकीच्या तिकीट विक्रीला आज थोड्यावेळापूर्वी सुरूवात झाली आहे. यावेळेस IRCTC ची वेबसाईट क्रॅश झाल्याची बाब देखील समोर आली आहे. उद्यापासून नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल, मडगाव, अहमदाबाद, जम्मू तावी, दिब्रुगड, रांची, भुवनेश्वर, आगरतळा, हावडा, पटना, बिलासपूर,बेंगळूरू, चैन्नई, तिरूअनंतपुरम या स्थानकासाठी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 रेल्वे गाड्यांच्या येणार्या जाणार्या अशा 30 फेर्या सुरू केल्या आहेत.