आजपासून बदलले Railway Reservation चे नियम, प्रवासाच्या 5 मिनिटांपूर्वी करता येणार तिकिट बुक

आता रेल्वेने काही ट्रेनसाठी प्रवास करण्यापूर्वी 5 मिनिटात तिकिट बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

आजपासून रेल्वे आरक्षणासंबंधित (Railway Reservation) काही नियम बदलले आहेत. आता रेल्वेने काही ट्रेनसाठी प्रवास करण्यापूर्वी 5 मिनिटात तिकिट बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. खरंतर रेल्वे आता हळूहळू कोरोना व्हायरसच्या महासंकटापूर्वीची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काही गोष्टी पुन्हा एकदा सुरु करत आहेत. याच पार्श्वभुमीवर कोरोनाच्या काळात रिजर्व्हेशनचे नियम बदलले आहेत. कारण कोरोना व्हायसरचा होणारा प्रादुर्भाव कमी केला जाईल.(Tejas Express येत्या 17 ऑक्टोंबर पासून पुन्हा धावणार; लखनौ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई मार्गाने नागरिकांना प्रवास करताना 'या' नियमांचे करावे लागणार पालन)

भारतीय रेल्वेने ठरवले आहे की, आता दुसरा चार्ज कोरोनापूर्वीच्या परिस्थितीसारखाच गाडी सुटण्यापूर्वी 30 मिनिटे आधी पर्यंत बनवला जाणार आहे. हा चार्ट कमीत कमी 5 मिनिटांपूर्वी बनवता येणार आहे. तर पहिला चार्ट ट्रेन सुटण्यापूर्वी 4 तास आधी तयार केला जाणार आहे. अशातच ज्या ट्रेनचा चार्ट 5 मिनिटांपूर्वी तयार केला जाईल तो 5 मिनिटांपूर्वी रिजर्व्हेशन करु शकतो. म्हणजेच दुसरा चार्ट बनण्यापूर्वी रिजर्व्हेशन होणार आहे.(Indian Railways: सणासुदीच्या काळात प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून भेट; ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये चालवणार 200 अतिरिक्त गाड्या)

ज्या प्रकारे 5 मिनिटांपूर्वी ट्रेनचे तिकिट रिजर्व्ह केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे वेळेनुसार तिकिट रद्द ही करता येणार आहे. तर कोरोनापूर्वीच्या परिस्थितीत पोहचण्यासाठी रेल्वेनेकडून अशा पद्धतीच्या सुविधा दिल्या जात आहेत. सणासुदीच्या काळात किती ट्रेन चालवल्या जाणार याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच रेल्वेने सणाच्या काळात 200 हून अधिक ट्रेन चालविल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत गरज भासल्यास ट्रेनची संख्या सुद्धा वाढवली जाणार आहे.