Rahul Gandhi Eats Mushroom Biriyani: राहुल गांधी यांनी युट्यूब फूड चॅनल व्हिलेज कुकींग टीमसोबत लूटला 'मशरुम बिर्याणी' भोजनाचा आनंद (पाहा व्हिडिओ)
राहुल गांधी यांनी प्रसिद्ध यूट्युब फूड चॅनल 'व्हिलेज कुकींग' (Village Cooking) सोबत मशरुम बिर्यणी (Mushroom Biryani) बनविण्याचा आणि भोजनाचाही (Rahul Gandhi Eats Mushroom Biriyani) आनंद घेतला. या हटके अंदाजातील त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियार जोरदार व्हायरल झाला आहे.
काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केरळ (Kerala) राज्यातील त्यांच्या वायनाड (Wayanad) लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी राहुल गांधी यांचा काहीसा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी प्रसिद्ध यूट्युब फूड चॅनल 'व्हिलेज कुकींग' (Village Cooking) सोबत मशरुम बिर्यणी (Mushroom Biryani) बनविण्याचा आणि भोजनाचाही (Rahul Gandhi Eats Mushroom Biriyani) आनंद घेतला. या हटके अंदाजातील त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियार जोरदार व्हायरल झाला आहे.
राहुल गांधी यांच्यासोबतचा हा व्हिडिओ 'विलेज कुकिंग' (Village Cooking) टीमने त्यांच्या चॅनलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच काही वेळातच तो सोशल मीडियात व्हायरल झाला. (हेही वाचा, हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही')
व्हिडिओ पाहायला मिळते की राहुल गांधी निळा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या पँडमध्ये अत्यंत सर्वसामान्य पेहरावात व्हिलेज कुकींग टीम सोबत दिसतात. राहुल गांधी यांनी या टीमसोबत मशरूम बिरयानी (Mushroom Biryani) तयार केली आणि त्यानंतर टिममधील सर्व सहकाऱ्यांसोबत सहभोजनाचाही आनंद घेतला. (हेही वाचा, Country Foods: ग्रामीण भागात पंचतारांकीत दर्जाचे अस्सल देशी पदार्थ बनवणाऱ्या युट्यूबर मस्तनम्मा यांचे निधन)
राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ पोस्ट करत व्हिलेज कुकींग ने म्हटले आहे की, आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांनी आमच्या कुकींगमध्ये प्रवेश केला. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले. यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. आज आम्ही पारंपरीत पदार्थ वापरत मशरुम बिर्याणी केली. राहुल गांधी यांनी आमच्यासोबत मशरुम बिर्याणी खाण्याचाही आनंद घेतला. आम्ही हा क्षण आयुष्यभर विसरणार नाही. आम्हाला हा अविस्मरणीय क्षण निर्माण करुन दिल्याबद्दल राहुल गांधी यांचे खूप खूप आभार.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)