Rahul Gandhi यांना असम मध्ये Batadrava Than मध्ये दर्शनाला जाण्यापासून रोखलं; पहा पुढे काय झालं (Watch Video)
आम्ही ११ जानेवारीपासून प्रयत्न करत होतो असे म्हटलं आहे.
सध्या असम मधून जात आहे. आज राहुल गांधी यांना असम मध्ये वैष्णव विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी पूजा अर्चना तसेच मंदिरात प्रवेशापासून रोखलं आहे. दरम्यान काल पत्रकार परिषदेमध्ये असम चे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी राहुल यांना आज राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा दिवशी Batadrava Than मध्ये दर्शनाला येऊ नये अशी सूचना केली होती. 'भगवान श्रीराम आणि शंकरदेव यांच्यात स्पर्धा नाही आणि देशाचे लक्ष अयोध्येवर असताना ते विनाकारण आसामकडे वळवले जाऊ नये. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांनी तेथे जाण्याचे टाळले तर आम्ही त्यांचे आभारी आहोत,'' असे बिस्वा म्हणाले आहेत.
नागोन जिल्ह्यातील बटाद्रवा ( Batadrava )हे आसामी संत-विद्वान, सामाजिक-धार्मिक सुधारक, कवी, नाटककार आणि १५व्या-१६व्या शतकातील आसामच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासातील एक मोठी असामी असलेल्या श्रीमंत शंकरदेव (१४४९-१५६८) यांचे जन्मस्थान आहे. Bharat Jodo Nyay Yatra: आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेत राडा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला .
पहा ट्वीट
जयराम रमेश यांनी या घटनेनंतर मीडीयाशी बोलताना राहुल गांधींना बटाद्रवाला जायचे होते. आम्ही ११ जानेवारीपासून प्रयत्न करत होतो, आमचे दोन आमदार त्यासाठी व्यवस्थापनाला भेटले. आम्ही 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिथे येऊ असे सांगितले. आमचे स्वागत होईल असे सांगण्यात आले. पण काल अचानक आम्हाला सांगण्यात आले की आम्ही दुपारी ३ वाजेपर्यंत तिथे येऊ शकत नाही. हा राज्य सरकारचा दबाव आहे. आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू पण दुपारी ३ नंतर तिथे जाणे खूप अवघड आहे. कारण अअम्हांला पुढचा प्रवास करायचा आहे. Rahul Gandhi Stopped from Entering Temple: असम मध्ये राहुल गांधींना Batadrava Than मध्ये सध्या प्रवेश नाकारल्यानंतर कॉंग्रेस चे मंदिरासमोर ठिय्या आंदोलन (Watch Video) .
"आपण लोकशाही देशात राहतो. पण इथे स्थानिक खासदार गौरव गोगोई यांनाही रोखले जात आहे. हा अन्याय आहे." असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.