Rahul Gandhi Attacks Modi Govt: बिहार मधील प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असे वचननाम्यात जाहीर केल्यानंतर राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi Attacks Modi Govt: बिहार विधानसभा निवडणूकांचा प्रचार करण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षातील नेतेमंडळी जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी काही आश्वासने ही नागरिकांना दिली जात आहेत. याच पार्श्वभुमीवर गुरुवारी भाजपने त्यांचा आगामी निवडणूकीसाठी वचननामा जाहीर केला आहे. मात्र भाजपच्या वचननाम्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण थोडे तापले आहे. तसेच विरोधी पक्षाकडून हल्लाबोल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खरंतर भाजपने आपल्या वचननाम्यात कोरोनावरील लसी मोफत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. जे विरोध पक्षांना पचलेले नाही. त्यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासरकावर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधत असे म्हटले आहे की, भारत सरकारने कोविड19 वर मात करण्याच्या रणनितीची घोषणा केली आहे. मात्र कृपा करुन राज्यातील निवडणूका सुद्धा पहाव्यात जेणेकरुन ते तुम्हाला कधी मिळेल. अन्य पक्षातील नेत्यांनी सुद्धा भाजपवर टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले की, बिहार मधील लोकांना मोफत कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा युपीसह अन्य राज्यांसाठी का नाही करण्यात आली आहे. निवडणूकीत जनता याचे उत्तर देईल.(Bihar Assembly Election 2020: भाजपला धक्का, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना व्हायरस संक्रमित)
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहार येथे त्यांच्या पक्षाचा वचननामा जाहीर केला. त्यावेळी सीतारमण यांनी असे म्हटले की, कोरोनाच्या वॅक्सीनसंबंधित मोठ्या स्तरावर प्रोडक्शन सुरु झाले आहे. बिहार मधील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार आहे. आमच्या वचननाम्यात आमचे हे पहिले वचन आहे. जे विरोधी पक्षांना जरा सुद्धा पचले नाही. त्यामुळे भाजप सरकारवर चहूबाजूंनी आता टीका करण्यास सुरुवात ही झाली आहे.