Rafale Deal: मोदी सरकार JPC चौकशीला का तयार नाही? राफेल विमान व्यवहारांवरुन राहुल गांधी यांचा सवाल

हे व्यवहार आणि चौकशी यांचा भारत सरकारशी जवळचा संबंध आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मौन बाळगून आहे. त्यावरुन काँग्रेसने निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मधल्या काळात पडद्याआड गेलेला राफेल विमान (Rafale Aircraft) खेरीदी व्यवाहार पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. राफेलच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे. मोदी सरकार राफेल विमान खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी का करत नाही? असा प्रश्न विचारत ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारांमध्ये झालेला कथीत घोटाळ्याचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्येही राहुल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला होता.

तब्बल 59 हजार कोटी रुपयांच्या राफेल विमान व्यवहारांची चौकशी फ्रान्समध्ये सुरु आहे. हे व्यवहार आणि चौकशी यांचा भारत सरकारशी जवळचा संबंध आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मौन बाळगून आहे. त्यावरुन काँग्रेसने निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्ला करत म्हटले आहे की, राफेल व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांवरुन जाहीर होते आहे की, मध्यस्थाला या व्यवहारात किती कोटी भेट म्हणून देण्यात आले.

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारला आहे की, केंद्र सरकार या व्यवहारांची चौकशी संयुक्त संसदीय समिती म्हणजेच JPC द्वारे चौकशी करण्यास का तयार नाही? राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये चार पर्यायही दिले आहेत. ज्यात गुन्ह्याची माहीत, मित्रांना वाचवायचे आहे, जेपीसी आणि राज्यसभा जागा नको आहेत आणि चौथा पर्याय आहे की वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. दरम्यान, राहुल गांधी या आधी एक म्हण वापरत 'चोर की दाढी में...' असे ट्विट केले होते. राहुल गांधी यांनी 3 जुलै रोजी हे ट्विट केले होते.

राहुल गांधी ट्विट

कांग्रेस (Congress) प्रवक्ते पवन खेडा (Pawan Khera) यांनीही राफेल लढावू विमानांच्या व्यवहारांवरुन (Rafale Jet Deal) केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडली आहे. मोदी सरकार (Modi Gonernment) हे पेहिले असे सरकार आहे ज्यांनी राष्ट्रीय सुर७ा आपल्या दोस्तांचे खिसे भरण्याचे माध्यम बनवले. त्यांनी म्हटले राफेल व्यवहाराच्या चौकशीसाठी फ्रान्सने न्यायाधीशाकरवी चौकशी सुरु आहे. परंतू, 24 तास उलठून गेले तरीही केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.