Pune Accident: पुण्यात भरधाव एसटी बसचा ब्रेक फेल, 7 वाहनांना धडक, सहा जण जखमी

भरधाव एसटीचा अचानक ब्रेक झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्याच्या फातिमानगरमध्ये  एसटीने बसने सात वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सहाजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वीच ट्रकने काहीजणांना उडवल्याची घटना पुण्यात घडली होती. भरधाव एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्यााने अपघात झाल्याची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.  मंगळवारी रात्री उशीरा ही घटना पुण्याच्या फातिमा नगर परिसरात घडली (हेही वाचा - ST चालकांना आता स्टेअरिंग हाती घेण्यापूर्वी मोबाईल वाहन चालकांकडे देणं बंधनकारक)

पुण्यातील फातिमा नगर भागात जात असलेल्या भरधाव एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. भरधाव एसटीचा अचानक ब्रेक झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आठ वर्षीय मुलासह सहा जण जखमी असल्याची माहिती आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघात प्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामीला ताब्यात घेण्यात आलं आहे.