तिरुमला यात्रेत पुण्याच्या Golden Boysची चर्चा; 25 किलो सोन्याचे दागिने घालून यात्रेत सहभाग, पाहणाऱ्यांची एकच गर्दी

पुणे: पुण्यातील एका कुटुंबाने तिरुमला येथील भगवान बालाजी मंदिराला नुकतीच भेटी दिली. त्या दरम्यान कुटुंबाने घातलेल्या 25 किलो सोन्याच्या दागिन्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Photo Credit- X

Tirumala Yatra: सनी नानासाहेब वाघचौरे (Sunny Waghchoure)आणि संजय गुजर(Sanjay Gujar), ज्यांना पुण्याचे गोल्डन बॉईज म्हणून संबोधले जाते. त्यांनी नुकतीच तिरुमला मंदिराला भेट दिली. त्यांच्या पेहराव्यावरून आणि दागिन्यांच्या शैलीमुळे मंदिर परिसरात त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी त्यांनी तिरुमला मंदिराला भेट दिली. यावेळी सनी नानासाहेब वाघचौरे याची पत्नी प्रीती सोनी ही त्याच्यासोबत होती. त्या तिघांसोबत फोटो काढण्यासाठी अनेक जण उत्सूक होते.

तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सुमारे 15 अंगरक्षकांचा त्यांचे सुरक्षेत समावेश होता. मात्र, तरीही त्यांच्या सुरक्षेत अनेक आवहाने सुरक्षारक्षकांना सहन करावी लागली. प्रीती सोनी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जी विविध नाटक मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. प्रीती सोनी या त्यांच्या जवळचा मित्र संजय यांच्यासोबत या यात्रेत सहभागी झाली होती.

फोटो काढणाऱ्यांची गर्दी

तिघेही पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे असून त्यांच्या समृद्ध जीवनशैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. बांधकाम व्यवसायात गुंतलेले सनी वाघचौरे आणि संजय गुजर हे दोघेही मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या उपक्रमांसाठी ओळखले जातात. सनी एक निर्माता म्हणूनही काम करत आहे. दोघांचे सोन्यावरील प्रेम हे जगजाहीर आहे. त्यांच्याकडे सोन्याने मढवलेले शूज, घड्याळे आणि आलिशान कार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement