Pulwama Attack Anniversary 2020: वर्षभरापूर्वी कुटुंबाला भेटून परतणार्या CRPF च्या जवानांच्या ताफ्यातील एक बसवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये जागीच 40 जवान ठार झाले होते. या भारतीय जवानांवरील सर्वात भीषण हल्ल्याची आज वर्षपूर्ती आहे. दरम्यान या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून आदरांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील देखील दोन जवानांनी आपला जीव गमावला होता. Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 42 CRPF जवानांची संपूर्ण लिस्ट.
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदसिर अहमद खान याने पुलवामा हल्ल्याची योजना आखली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात 41 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. मुदस्सिरने आत्मघाती हल्ला घडवण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन आणि स्फोटके मिळवून दिली होती. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. Pulwama Attack Anniversary: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्षे पूर्ण; अजूनही ताज्या आहेत जखमा, ज्याने देशाचा चेहरामोहरा बदलला.
अमित शहा यांचे ट्वीट
I pay homage to the martyrs of Pulwama attack.
India will forever be grateful of our bravehearts and their families who made supreme sacrifice for the sovereignty and integrity of our motherland.
— Amit Shah (@AmitShah) February 14, 2020
राजनाथ सिंह यांचे ट्वीट
Remembering the fallen @crpfindia personnel who were martyred during the dastardly attack in Pulwama(J&K) on this day in 2019.
India will never forget their sacrifice. Entire nation stands united against terrorism and we are committed to continue our fight against this menace.
— Rajnath Singh (@rajnathsingh) February 14, 2020
CRPF चे ट्वीट
"तुम्हारे शौर्य के गीत, कर्कश शोर में खोये नहीं।
गर्व इतना था कि हम देर तक रोये नहीं।"
WE DID NOT FORGET, WE DID NOT FORGIVE: We salute our brothers who sacrificed their lives in the service of the nation in Pulwama. Indebted, we stand with the families of our valiant martyrs. pic.twitter.com/GfzzLuTl7R
— 🇮🇳CRPF🇮🇳 (@crpfindia) February 13, 2020
वसुंंधरा राजे यांचे ट्वीट
#Pulwama में हुए बर्बर आतंकी हमले की बरसी पर मैं उन सभी अमर सपूतों की शहादत को सलाम करती हूं, जिन्होंने मां भारती की आन-बान-शान के लिए अपना सर्वस्व न्यौछावर कर दिया।
जय हिन्द, जय हिन्द की सेना#PulwamaAttack pic.twitter.com/q3zjpLa7Km
— Vasundhara Raje (@VasundharaBJP) February 14, 2020
वर्षभरापूर्वी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 41 जवानांच्या स्मृतीस्थानी बांधलेल्या स्मारकाचे आज (14 फेब्रुवारी) लेथपुरा कॅम्पमध्ये उद्घाटन होणार आहे.