PUBG Game Ban: पबजी खेळावर राजकोट- सुरत नंतर भावनगर आणि गिर सोमनाथ येथे बंदीची मागणी

त्यानंतर आता भावनगर (Bhavnagar)आणि गिर सोमनाथ (Gir Somnath) जिल्ह्यात पबजी खेळावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Pubg Addiction | (Photo credit: archived, edited, symbolic images)

PUBG Game Ban: गेल्याच आठवड्यात सर्वात लोकप्रिय गेम पबजीवर (PUBG) सुरत (Surat)-राजकोट (Rajkot) येथे बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता भावनगर (Bhavnagar)आणि गिर सोमनाथ (Gir Somnath) जिल्ह्यात पबजी खेळावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. पबजी या खेळामुळे हिंसा करण्यास भाग पाडत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येथे राहणारी व्यक्ती पबजी खेळताना आढल्यास त्याच्यावर 188 कलम कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

त्याचसोबत मोमो चॅलेंज खेळमुळे ही दुर्घटना होत असल्याचे समोर आले आहे. तसेच या खेळामुळे अज्ञात व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हानी पोहचवण्यास प्रवृत्त करत असल्याचे म्हटले गेले आहे.(हेही वाचा-PUBG Game Ban: सुरत शहरात 'पबजी गेम'वर बंदी; असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे ठरले भारतातील पहिले शहर)

दक्षिण कोरियाची 'ब्लूहोल'(Bluehole) या उपकंपनीने तयार केलेल्या या खेळाला एक वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आजवर या खेळाला खुप प्रसिद्धी मिळाली आहे, मात्र भारतात हा गेम लॉन्च झाल्याच्या अवघ्या सहा महिन्यातच या बद्दलचे दुष्परिणाम दिसून आले. तसेच पालकांकडून ही पबजी गेम बद्दल तक्रारी अधिकाधिक वाढू लागल्या आहेत. तर एका विद्यार्थ्याच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिक्षा पे चर्चा 2.0 या कार्यक्रमादरम्यान पबजी खेळाबद्दल प्रश्न विचारला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif