Protests Against Olympic-Winning Wrestlers: ज्युनियर कुस्तीपटूंचे दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन; Bajrang Punia, Sakshi Malik आणि Vinesh Phogat यांच्या विरोधात केली निदर्शने
आज विविध राज्यातून शेकडो ज्युनियर कुस्तीपटू जंतरमंतरवर त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण वर्ष गमावल्याच्या निषेधार्थ एकत्र आले.
Protests Against Olympic-Winning Wrestlers: दिल्लीतील (Delhi) जंतरमंतरवर (Jantar Mantar) ज्युनियर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू झाले आहे. यावेळी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या पैलवानांच्या विरोधात कुस्तीपटूंनी निदर्शने केली. येथे विरोध करण्यासाठी आलेल्या कुस्तीपटूंनी बजरंग, साक्षी आणि विनेश यांच्यावर त्यांचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. हे तिघेही भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्या विरोधासाठी सक्रिय होते.
ज्युनियर कुस्तीपटूंनी अलीकडेच क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेले पॅनल रद्द करून निलंबित कुस्ती संघटना पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या विविध भागातून ज्युनियर कुस्तीपटू बसमधून जंतरमंतरवर पोहोचले होते.
गेल्या एक वर्षापासून भारतीय कुस्तीमध्ये अनेक गोष्टी बिघडत चालल्या आहेत. वरिष्ठ कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना आपली खुर्ची गमवावी लागली. त्यानंतर निवडणुका झाल्या तेव्हा खेळाडूंनी नूतन अध्यक्ष संजय सिंह यांना विरोध केला. त्यानंतर साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली आणि बजरंग पुनिया-विनेश फोगट यांनी त्यांचे पुरस्कार परत केले. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघटनेलाच निलंबित केले. (हेही वाचा: IAF Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी; लवकरच सुरु होणार अग्निवीर वायुसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, 12वी पास करू शकतात अप्लाय)
आता बुधवारी (3 जानेवारी) पुन्हा एकदा कुस्तीपटू जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत, मात्र यावेळी हा विरोध कुस्ती संघटना किंवा त्यांच्या अधिकार्यांचा नसून बजरंग, साक्षी आणि विनेश फोगट यांच्या विरोधात आहे. आज विविध राज्यातून शेकडो ज्युनियर कुस्तीपटू जंतरमंतरवर त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण वर्ष गमावल्याच्या निषेधार्थ एकत्र आले. या परिस्थितीसाठी त्यांनी अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश यांना जबाबदार धरले. दरम्यान, जानेवारी 2023 पासून कुस्ती संघटना वादात सापडल्यापासून भारतीय कुस्ती संघटनेला दोनदा निलंबित करण्यात आल्याने राष्ट्रीय शिबिरे आणि स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत. निलंबित करण्यात आलेली भारतीय कुस्ती संघटना पुन्हा स्थापन करावी, अशी सर्व आंदोलक तरुण कुस्तीपटूंची मागणी आहे.