Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद; कोरोना व्हायरस व लॉक डाऊनबाबत होणार चर्चा

या व्हायरसशी सामना करण्यासाठी लॉक डाऊनसोबत इतर अनेक उपयोजना राबवल्या जात आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi interacting with CMs of different state over coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

भारतात कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाची संख्या 20,000 च्या वर गेली आहे. या व्हायरसशी सामना करण्यासाठी लॉक डाऊनसोबत इतर अनेक उपयोजना राबवल्या जात आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तिसर्‍या वेळी राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत. देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनच्या परिस्थितीबाबत ही बैठक असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिल रोजी सकाळी सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतील. या दरम्यान पीएम मोदी सध्याच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांचा अभिप्रायही घेतील. राज्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे केंद्र सरकार पुढील धोरण आखेल.

एएनआय ट्विट -

याआधी, 11 एप्रिलला झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतरच केंद्र सरकारने लॉक डाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. या बैठकीत बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन वाढविण्यावर सहमती दर्शविली होती. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतची होणारी ही व्हिडिओ कॉन्फरन्स सोमवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. आता या बैठकीनंतर कोणता महत्वाचा निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा: Coronavirus: डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास होणार 'ही' मोठी शिक्षा; केंद्र सरकारने आणला नवा कायदा)

आज केंद्र सरकारने डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या विरुद्ध एका नव्या कायद्याला मंजुरी दिली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर यांच्यावर हल्ला केल्यास हा एक अजामीनपात्र गुन्हा असणार आहे. यासाठी त्या संबंधित व्यक्तीस 3 महिने ते 5 वर्षे इतका मोठा कारावास ठोठावला जाऊ शकतो. तसेच 50 हजार ते 2 लाख इतका दंड सुनावला जाऊ शकतो. दरम्यान, भारतातील कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20471 पर्यंत वाढली आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत 49 मृत्यूंसह 1486 नवीन घटना समोर आल्या आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif