नरेंद्र मोदी यांनी घेतले सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन (Watch Video)
सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सध्या अनेक मान्यवरांनी रीघ लावली आहे.
भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं 6 ऑगस्टच्या रात्री हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. सामान्यांसह राजकारणी, कलाक्षेत्रातील मान्यवरांनी यावर हळहळ व्यक्त केली आहे. सध्या सुषमा स्वराज यांचं पार्थिव शरीर त्यांच्या घरी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवचे राहत्या घरी जाऊन दर्शन घेतले तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सध्या अनेक मान्यवरांनी रीघ लावली आहे.
सुषमा स्वराज यांच्या निधनाचं वृत्त समजताच रात्री ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी आपली श्रद्धांजली अर्पण केली होती. सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारताच्या एक तेजस्वी पर्वाचा अंत झाला असं म्हणत त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या. दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान भाजपा मुख्यालयात सुषमा स्वराज यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाजपा कार्यकर्त्यांनीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निधनाच्या अवघ्या तीन तास आधी मानले होते नरेंद्र मोदी यांचे आभार
ANI Tweet
सुषमा स्वराज यांनी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री पद सांभाळले होते. भारताचं परदेश धोरण मजबूत करण्यामध्ये स्वराज यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी देशाबाहेर अडचणीत सापडलेल्या भारतीयांना त्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला होता. इंदिरा गांधींनंतर सुषमा स्वराज या दुसर्या महिला मंत्री होत्या ज्यांनी परराष्ट्र मंत्रीपद सांभाळलं होतं.