International Yoga Day: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपति भवनात तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजपथावर साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिवस

तर दुसरीकडे आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी राष्ट्रपति भवनात दरवर्षी प्रमाणे यंदाही योग शिबिराचे आयोजन केले होते.

President Ramnath Kovind & Rajnath Singh (Photo Credits: ANI)

International Yoga Day2019: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्त्व लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे औचित्य साधून 2015 पासून सुरु केलेले योगसाधनेचे व्रत यंदाही कायम ठेवले. त्यांच्या या महत्त्वपुर्ण अशा उपक्रमाला सर्व दिग्गज नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं पाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांनी दिल्लीत राजपथावर योगासने केली. तर दुसरीकडे आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी राष्ट्रपति भवनात दरवर्षी प्रमाणे यंदाही योग शिबिराचे आयोजन केले होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपति भवनात आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, "मागील वर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रपति भवनात योग दिवस साजरा करत असल्याने मला फार आनंद होत आहे. हा केवळ हे सोहळा नसून योगा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे."

तर दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत राजपथावर असंख्य लोकांसमवेत योगासने केली. यात त्यांच्यासोबत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर ही उपस्थित होते.

योगसाधनेचे महत्त्व जनतेला पटवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: 40,000 लोकांसोबत योगसाधनेला बसले. रांची येथील प्रभात तारा मैदानावर या योग शिबीराचे आयोजन करण्यात आले.