PNB ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, 1 डिसेंबर पासून Cash Widrawals च्या नियमात होणार बदल
जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 1 डिसेंबर पासून पीएनबी खातेधारकांना पैसे काढण्यासंदर्भातील नियमात बदल होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या मते पैसे काढण्याबद्दलचा हा नियम अधिक सुरक्षित असणार आहे. नव्या नियमानुसार बँकेच्या खात्यातून जर खातेधारकांना पैसे काढायचे असल्यास त्यंमा OTP द्यावा लागणार आहे. त्यानुसार पीएनबी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एक वेळेस 10 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढत असल्यास ग्राहकांना OTP द्यावा लागणार आहे.(Laxmi Vilas Bank Update: लक्ष्मी विलास बँकेचे DBS मध्ये विलीकरण करण्याला स्थगिती देण्याच्या मागणीला हायकोर्टाने दिला नकार)
पीएनबीचा हा नवा नियम येत्या 1 डिसेंबर पासून रात्री 8 वाजतादरम्यान लागू होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 10 हजारांहून अधिक रक्कम काढल्यास त्यांना OTP देणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे हा ओटीपी ग्राहकांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर पाठवला जाणार आहे.(PF Benefits: नोकरी सोडल्यावर किंवा बदली केल्यावर लगेच पीएफ मधील पैसे का काढू नये?)
दरम्यान, पीएनबी मध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचे विलिकरण झाले आहे. तर पीएनबी ओटीपीची सुविधा या बँकांच्या ग्राहकांसह एटीएमवर ही लागू होणार आहे. यापूर्वी भारतीय स्टेट बँकेने एटीएम मधून OTP बेस्ड कॅश विड्रॉल सुविधा सुरु केली होती. गेल्या सप्टेंबर महिन्यात एसबीआयने 10 हजार किंवा त्याहून अधिक रक्कम काढल्यास ओटीपी देणे गरजेचे असणार असल्याचे स्पष्ट केले होते. ही सुविधा ग्राहकांसाठी 24 तास सुरु केली होती. याआधी ही सुविधा मर्यादित वेळासाठीच होती.