आज PM Narendra Modi विशेष गुणधर्म असलेल्या 35 पिकांची वाणे राष्ट्राला समर्पित करणार
हवामान बदल आणि कुपोषणाचे आव्हान पेलण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेने (ICAR) ने विशेष गुणधर्म असलेले पिकांचे वाण विकसित केले आहे. अशा 35 पिकांची विशेष बियाणे, 2021 या एकाच वर्षात विकसित करण्यात आली आहेत.
हवामान बदलानुकुल तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयसीएआर संस्था, राज्य आणि केंद्रीय कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांद्वारे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष गुणधर्म असलेल्या पिकांच्या 35 वाणांचे (Crop Varieties With Special Traits) लोकार्पण करतील. रायपूरच्या राष्ट्रीय बायोटीक स्ट्रेस टॉलरन्स संस्थेच्या नवीन परिसराचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या प्रसंगी पंतप्रधान, कृषी विद्यापीठांना हरित परिसर पुरस्कार देखील देतील आणि नवनवीन पद्धती वापरणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच उपस्थितांना संबोधित करतील. केंद्रीय कृषी मंत्री आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री या वेळी उपस्थित असतील.
विशेष गुणधर्म असलेल्या पिकांविषयी माहिती:
हवामान बदल आणि कुपोषणाचे आव्हान पेलण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेने (ICAR) ने विशेष गुणधर्म असलेले पिकांचे वाण विकसित केले आहे. अशा 35 पिकांची विशेष बियाणे, 2021 या एकाच वर्षात विकसित करण्यात आली आहेत. यात,दुष्काळ सहन करणाऱ्या चण्याचे वाण, गळून जाणे किंव वंध्यत्व अशा समस्यांवर मात करणारे तूरीचे/देशी चण्याचे वाण, लवकर विकसित होणारे सोयाबीनचे वाण, रोगप्रतिकारशक्ति असलेले तांदळाचे आणि जैविक ताकद अधिक असलेले,गव्हाचे वाण बाजरी, मका,चणे, राजगीरा, कुट्टू,फाबा बिन, विंगड बिन, अशा जातीची वाणे विकसित करण्यात आली आहे.
या विशेष गुणधर्म असलेल्या पिकांच्या वाणात काही पिकांमध्ये असलेल्या विशेष पोषणरोधी मूल्यांकांचा सामना करण्याची ताकदही असते. ही पोषणरोधी मूल्ये मानव आणि प्राण्यांच्या शरीराला घातक असतात, त्यांची काही उदाहरणे म्हणजे, पुसा डबल झीरो मोहरी 33, संकरीत आरसीएच -1 ज्यात ऱ्यूसिक ॲसिड असते आणि एक सोयाबीन वाण –जे पोषणविरोधी तत्वापासून मुक्त आहे, अशा वाणांचा समावेश आहे. त्याशिवाय, सोयाबीन, ज्वारी, बेबी कॉर्न, यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेविषयी माहिती
रायपूर येथील राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेची स्थापना, जैविक तणावांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे , मनुष्यबळ निर्मिती आणि धोरणात्मक सहाय्यासाठी झाली आहे. 2020-21 पासून या संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरु झाले आहेत.
हरित परिसर पुरस्कारांविषयी माहिती
राज्याच्या तसेच केंद्रीय कृषी विद्यापीठांना अधिक हरित आणि स्वच्छ ठेवण्यास प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्याना या कामासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने, हे पुरस्कार दिले जातात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)